Category: Marathi kaavya

  • मंत्र साखरी – MANTR SAAKHAREE

    उडती फुलपाखरे मजेने पंख पसरुनी अवतीभवती फुलाफुलांतिल मकरंदासव गंध उधळुनी अवतीभवती सानथोर जीवांनी साऱ्या सुगंध प्यावा आनंदाने सृष्टी जपण्या मंत्र साखरी जपत रहावा आनंदाने झिंगुन वाऱ्याने लोळावे तृणपात्यांच्या अंगांगावर गवतफुलांनी नाचत गावे तृणपात्यांच्या अंगांगावर मोरपिसाचे कलम सरसरा उखडत जाते भयास जर्जर अक्षररूपी ठिणगी जाळे अंधरुढींच्या भुतास जर्जर असे लिहावे तसे लिहावे नकाच सांगू मला कुणीहो…

  • मुक्त करविले आहे – MUKT KARAVILE AAHE

    हा क्रम अन या, मात्रा पाहुन, एक नवोदित, वृत्त घडविले आहे यातिल गा गा मध्ये ल ल गा, वा गा ल ल मी, सहज बसविले आहे गा ल ल ल ल गा, गा गा गा ल ल, गा ल ल गा ल ल, गा ल ल ल ल गा गागा म्हणता म्हणता, या रचनेला, मुक्तक…

  • कौमुदी – KAUMUDEE

    सूर्यकिरण कोवळे चुंबिता उमले कमळ कळी कार्तिक स्नानासाठी उतरे बिंब रवीचे जळी झळाळणाऱ्या पीत दुपारी मिटुन केतकी दले जर्द पितांबर पांघरुनी बन सुवासिक झोपले पिवळी तांबुस सांज मखमली श्यामल श्यामल धरा टिपुर टिपुर टिपऱ्यांच्या संगे खळखळ गातो झरा गोधूळीने दिशा रंगल्या गवळण काढे धार गोप टाकतो गोठ्यामध्ये भारा हिरवागार लाल निखाऱ्यावरी चुलीच्या पात्र ठेवता माय…

  • दीप शर्वरी – DEEP SHARVAREE

    श्रावण रमणी दीप शर्वरी दिवा लाविते श्रावण रमणी गोड गोजिरी दिवा लाविते पश्चिम सूर्याला वंदोनी हृदय मंदिरी श्रावण रमणी पीत पावरी दिवा लाविते अंधारे अंगण उजळाया तिन्हीसांजेस श्रावण रमणी वधू लाजरी दिवा लाविते हळदीकुंकू रेखुन भाळी तुळशीपाशी श्रावण रमणी प्रिया बावरी दिवा लाविते इंद्रधनूवर झोके घेउन दमल्यावरती श्रावण रमणी गझल नाचरी दिवा लाविते

  • आखाडी अवस – AAKHAADEE AVAS

    सांजेला पिंपळी येताच थवे आखाडी अवस पेटवी दिवे पिंपळ पारावर मैफलीत गप्पांच्या अड्ड्यात सुंदर खल आषाढी धारांत गटारी न्हाती खळखळ वेगे धावत जाती खराटे घेऊन निघाल्या बाया झाडून गटारी दिवे लावाया गटार तीरी समयांची रांग तुळशीच्या रानी डोलते भांग

  • आत्मभक्ती – AATMA BHAKTEE

    जीव जाणतो जीवांमध्ये ज्ञान राहते जीवाहुन या अमुल्य दुसरे काही नसते कर्म करावे जैसे तैसे फळ मिळते जाणू आत्म्यातील आनंद लुटाया भय सारे त्यागू सम्यकदृष्टी जीवांसाठी आत्मधर्म आहे शरण्य अपुल्या आत्म्याहुन ना कुणी अन्य आहे अंतर्यामी शुद्धात्म्याला सदैव ठेवावे अपुल्या वाटेवरून निर्भय होऊन चालावे आत्मशांतीची खरी संपदा जीवा लाभाया आत्मभक्तीला जाणुन घ्यावे मुक्ती साधाया

  • भिजली वर्दळ – BHIJALEE VARDAL

    जवळपास वा दूरदूरवर ओळख सुकली भिजते आहे हिरवा श्यामल फिकट पारवा श्रावण घन मनी दाटत आहे निळसर राखी सडकेवरुनी भिजली वर्दळ वहात आहे वर्दळीस मी भरून डोळी घनास मनीच्या शिंपीत आहे किलबिल चिवचिव ऐकायाला वाऱ्यासंगे हलता झाडे पत्र्यांवरती टपटप उतरत पाऊस तेव्हा म्हणतो पाढे असेच केव्हातरी आवडे जगावयाला पावसासही पाढे म्हणता म्हणता गातो माझ्यासंगे मजेत…