-
सोय – SOY
मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय
-
गझनीत – GAZNEET (SONNET)
सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे पिवळ्या जमीनी कुरण जांभळे…
-
माझे सॉनेट – MAAZE SONNET (SUNEET)
आम्ही मेघ सावळे दाटता नभी अश्वांवर बसूनी झिंगतो वात हूड वीज आसूड घुमवी कडकडा उधळतात अश्व चौखूर आम्ही कोसळू धडधडा कडा ओतेल मौक्तिके शुभहस्ते ओंजळीत भरूनी धनधान्य पिकवतील ग्रामस्थ नीरास वळवूनी भागवू तहान धरणांची सांडू लोळून गडगडा व्हावयास बाष्प हलके तापून उकळू तडतडा लहरण्या मुक्त विहरण्या मोदे वर जाऊ उडूनी अदृश्य होऊन फिरू तारांगणी नक्षत्रफुले…
-
झबक बाई – ZABAK BAAEE
सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास
-
फाल्गुन सरी – FAALGUN SAREE
फाल्गुन मासी रिमझिमणाऱ्या झरती पाऊससरी झरती पाऊससरी …. आभाळाच्या आल्या पोरी नाचत धरेवरी नाचत धरेवरी… रिमझिम पाऊससरी धरेवर आल्या पाऊससरी … भिजले अंगण भिजल्या वाटा भिजल्या चिंब सरी भिजल्या चिंब सरी … पहाटेस कुणी कचरावेचक चाले रस्त्यावरी चाले रस्त्यावरी …. उचलून कचरा सारा सारा घरचा रस्ता धरी… घरचा रस्ता धरी … वर्दळ वाढत जाई हळुहळु…
-
तीर्थंकर चरण – TEERTHANKAR CHARAN
आदिनाथ तीर्थंकर पहिला चरण तळी ऋषभ अजितनाथ तीर्थंकर दुसरा चरण तळी गजराज संभवजी तीर्थंकर तिसरा चरण तळी अश्व अभिनंदन तीर्थंकर चौथा वानर चरण तळी सुमति जिन तीर्थंकर पंचम चकवा चरण तळी पद्मप्रभू तीर्थंकर षष्ठम लोटस चरण तळी सुपार्श्व जिन तीर्थंकर सप्तम स्वस्तिक चरण तळी चंद्रप्रभू तीर्थंकर अष्टम चंद्रकोर चरणी पुष्पदंत तीर्थंकर नववा चरण तळी मगर…
-
अक्षर मोती – AKSHAR MOTEE
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे…