-
हुंबाड वारा – HUMBAAD VAARAA
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल…. भेटावे वाटेल मनास तेव्हा धाडावी छानशी गझल…. कशास मोजाव्या मात्रा नि बित्रा अक्षरगण साचे वृत्तांची जत्रा … फुलांच्या संगे खेळेन रंग वाऱ्याची समाधी करेन भंग… रंगास उधळत फुलांच्या वेड्या काढूया वाऱ्या पक्ष्यांच्या खोड्या… वाटेवर धोंडा मारता शिंग त्याच्यावर धो धो ओतेन रंग … वाटेच्या धोंड्यास सांगेन गोष्टी गोष्टीत…
-
केव्हातरी मिटाया – KEVHAATAREE MITAAYAA
केव्हातरी मिटाया मज लागणार डोळे ढाळू नकोस अश्रू मम तेवणार डोळे शब्दांस गोल झाल्या लावून धार डोळे बनुनी कलम दुधारी करणार वार डोळे पत्रे उडून जातिल कर अंगणात गोळा पत्रांवरी पहाटे दव ओतणार डोळे माती तरूतळीची बकुळीस गोष्ट सांगे माझे तुझे मिळूनी होतील चार डोळे नेत्रांस दान करुनी दृष्टी दिली कुणाला ठाऊक ना जरी हे…
-
सीमोल्लंघन SEEMOLLANGHAN
सीमेचे उल्लंघन केल्यानंतर बोलू पुन्हा वेगळे आल्यावर प्रत्यंतर बोलू भटकुन भटकुन मन थकल्यावर ध्यानाग्नीतुन हरेक ओठांवर हलतो तो मंतर बोलू आंतरजाली फिरती शोधक नित्य इंजिने गूगलवरच्या इंजिनांस त्या व्यंतर बोलू देव पाहण्या नकाच काटू अंतर बिंतर नीतळ आत्म्यालाच स्वतःच्या अंतर बोलू विचार मंथन करण्याचा अन बोलायाचा मला सुनेत्रा आहे ध्यास निरंतर बोलू
-
गुल्लिका – GULLIKAA
विंध्यगिरीवर श्यामल सुंदर जलद दाटले पुन्हा गोमटेश बाहुबलीवर जल मुक्त सांडले पुन्हा हाती चंबू सान दुधाचा टोकावर गुल्लिका धार ओतता धवल दुग्धमय घन कोसळले पुन्हा नीर क्षीर चंदन अन केशर अष्टगंध औषधी प्रपात धो धो सुवर्ण हळदी लोट उसळले पुन्हा पारिजात मोगरा चमेली चंपक जाई जुई सुरभित पुष्पांनी भरलेले मेघ बरसले पुन्हा अखंड रज्जूवर प्रेमाच्या…
-
अभ्यंतर – ABHYANTAR
टिपत राहणे काव्य निरंतर हाच जादुई जंतर मंतर माझ्यासाठी मम अभिव्यक्ती हाच जादुई जंतर मंतर अभ्यंतर काबूत असावे हाच जादुई जंतर मंतर अंतर अपुले सतत चाळणे हाच जादुई जंतर मंतर अंतर पाहुन वेग ठरविणे हाच जादुई जंतर मंतर स्त्री पुरुष दो माणूस जाती हाच जादुई जंतर मंतर देव नारकी गती जाणणे हाच जादुई जंतर मंतर…
-
प्रवासी पक्षी – PRAVAASEE PAKSHEE
जीव प्रवासी पक्षी आहे क्षितिजावरची नक्षी आहे वाघ कसा रे शाकाहारी तो तर प्राणीभक्षी आहे मोजत बसणारा योनींना गरगर फिरतो अक्षी आहे मुक्ती कशाची मोहांधाला बसून अपुल्या कक्षी आहे सुनेत्रास या कधीच कळले रत्नत्रय धन वक्षी आहे मात्रावृत्त (१६ मात्रा)
-
वारा चंचल – VAARAA CHANCHAL
शिशिराच्या पाचोळ्यातिल मज अक्षर अक्षर हाक मारते निरोप घेण्या वाज वाजते वसंत वाऱ्यावरती झुलते पीत पोपटी मृदु पर्णांकुर पाहुन सृष्टी हात जोडते किरण कोवळे चराचरावर मोद सांडता हृदय डोलते … पानांच्या जाळीतुन उतरे ऊन खोडकर हळदी तरुतळ मृदा तळीची उडत राहते वारा चंचल ऊन न चंचल गतकाळाच्या आठवणीतिल पिसे लहरती वाऱ्यावरती संधिकाल की उषाकाल हा…