-
फळी – FALHEE
दीपावली दीपावली दीपातळी दीपावली आली दिवे लावावया दीपा कळी दीपावली नामासवे नावेपरी दीपा जळी दीपावली गालावरी दोन्ही पडे दीपा खळी दीपावली चाफा फुले गाण्यातुनी दीपा दळी दीपावली सवती जरी हा काफिया दीपा फळी दीपावली सोन्यापरी आहे खरी दीपा सळी दीपावली
-
सनई – SANAI
भूचक्रासम गरगर चकली कढईमध्ये नाचत आहे शुभ्र करंजी चंद्रकलेसम पाटावरती हासत आहे रवा आणखी बेसन लाडू मोतिचुराच्या वड्या नि चिवडा तबकामध्ये भरून कन्या आनंदाने वाटत आहे शंकरपाळी खारी बुंदी अनारशांची नाजुक जाळी यांची गोडी माय दिवाळी चवीचवीने चाखत आहे सुतरफेणी बालुशाही नि बिनकाटेरी कडबोळ्यांनी डबे खचाखच भरून ताई वाट कुणाची पाहत आहे रांग दिव्यांची अंगणातली…
-
लक्षुमी -LAKSHUMEE
दिवे अंगणी लावूया गीत दिव्यांचे गाऊया गाय वासरू इथे उभे त्यांना चारा घालूया धनतेरस ही ध्यानाची धने गूळ जल प्राशूया नरक चतुर्दशीस औक्षण करून श्रमणा वंदूया दीपावली जिन मंदिरी भल्या पहाटे पाहूया संध्यासमयी शुद्ध मनी मोक्ष लक्षुमी पुजूया फराळ वाटू प्रतिपदेस गप्पा टप्पा मारूया भाऊबीजेला प्रवास बसुन विमानी गाऊया अशी दिवाळी सौख्याची प्रेमामध्ये न्हावूया
-
घनसर नाणी – GHANSAR NAANEE
मधाळ प्रीती वचनामध्ये उतरू दे ग सुकलेले सुख जळणामध्ये उतरू दे ग बुडून जाता भरतीच्या या उचंबळात मधुरा भक्ती भजनामध्ये उतरू दे ग दे चटका डाळीस शिजवुनी जड कढईत रंग गुळाचा पुरणामध्ये उतरू दे ग जिरे मिरे वाटून फोडणी दे डाळीस स्वाद तयांचा वरणामध्ये उतरू दे ग रदीफ माझ्या गझलेमधले वादातीत पदे आरत्या कवनामध्ये उतरू…
-
चांदणपंखी सही – CHANDAN PANKHEE SAHEE
रम्य वनी चंद्रिका बैसली तळ्यात प्रतिबिंबी वाऱ्याने जल हलता थरथरली ती अंगांगी जललहरींनी काठ गाठला डुलत हलत जेव्हा गालावरती तिच्या उमटली खोल खळी तेव्हा अवचित झाली नभात गर्दी श्यामल मेघांची जळात नाचत सरी उतरल्या अंग धुण्यासाठी ढगाआडुनी शुभ्र चंद्रिका बिंब जळी शोधे जांभुळलेले वस्त्र तळ्यावर वरून ती फेके दिव्य प्रभेने झळाळणारे लेउन वस्त्र मही निळ्या…
-
उडत्या ठिणग्या – UDATYAA THINAGYAA
लिहिले काही मुलाफुलांना कळेल ऐसे लिहिले सोपे माझ्यासंगे वळेल ऐसे पीडेलाही मुक्ती देण्या लेखणीतुनी लिहिले पीडा पूर्णपणे ती टळेल ऐसे कर्मनिर्जरा करण्यासाठी देह झिजविला लिहिले माझे पुण्य अता फळफळेल ऐसे धगधगणाऱ्या राखेमधुनी उडत्या ठिणग्या लिहिले अनवट ठिणग्यांनीही जळेल ऐसे हृदय जादुई कलम जादुई म्हणुन “सुनेत्रा” लिहिले मंतर भ्रम भय अवघे गळेल ऐसे गझल मात्रावृत्त (मात्रा…
-
वर्तमान मम् अतीव सुंदर – VARTMAN MAM ATEEV SUNDAR
जगावयाला आनंदाने वर्तमान मम् अतीव सुंदर भूतही सुंदर भविष्य सुंदर वर्तमान मम् सजीव सुंदर येणारा क्षण हरेक आहे माझ्यासाठी दिव्य पर्वणी समृद्धी अन सुख शांतीचे चित्र रेखितो भरीव सुंदर अंतरातली शुचिता उजळत जाई कणकण मम् देहातिल प्रकाशात आत्म्याची मूर्ती हवी तशी मज घडीव सुंदर तापतापता नीर तळ्यातिल बदके फिरती तप्त वाळुवर राजहंस विहरण्या जलावर नाचत…