Category: Marathi kaavya

  • घडी – GHADEE(MOMENT)

    पाऊस सुखाचा श्रावण रे .. झरझरतो सुख मन भावन रे … घडीत पाऊस ऊन घडीभर घडीत अवघड कर्पूर घनसर सुखद सयींची घडी उन्हावर गोळा झाले मुठीत अत्तर …… अत्तर घन रिमझिमता झरझर … सत्त्यासम श्रावण येतो रे आषाढ कधी तो होतो रे भाद्रपदासम दो नेत्रांतून . घट कलश होऊनी झरझरतो रे … . हा प्रभाव…

  • निवळे – NIVALE(CLEARS UP)

    ताम्रघटावर पर्ण वसन सोन्यासम पिवळे नारळ कळसा हिरवी राई ग्राम ग किवळे .. खणखणणारी कुंदन नाणी करात माझ्या गझल “सुनेत्रा” ताल बांधता सुरात माझ्या….. ……. रुबाईतले मुक्तक माझे उदका निवळे..

  • धरोहर -DHAROHAR(HERITAGE)

    गगन गिरीवर ख पुष्प अंथर सायंकाळी मुक्त धरोहर निर्झर हसरे झील सरोवर चित्र हवे ते उतरव भू वर नीलमण्यांची किमया हितकर ये पारीसा नेस पितांबर सखी “सुनेत्रा” लखलख अंबर

  • सौध – SAUDH(PALACE)

    एक ताजी बघ रुबाई .. पसरण्या पाया भटाला ना दिली मी ओसरी बघ.. स्नानघर करण्या न दिधली कोरडी मी ओसरी बघ ….. शेटजीची बाल्कनी वा गॅलरी नव सौध शाही .. टोक माझे राजवाडी बुरुज टेहळणीस राही …..

  • पूज्य – PUJYA(WORSHIPFUL)

    मोक्षलक्ष्मी अंतरीची मम सुनेत्रा नित्य दर्शन देय मज आतम सुनेत्रा पुण्य पाठी रम्य सृष्टी थांबलेली आत्मश्रद्धा सावरे कायम सुनेत्रा रान हिरवे नभ निळाई पांघरोनी भाव अक्षर वाचते आगम सुनेत्रा भूत सुंदर बिंब सुंदर नेत्र मिटता वर्तमानी कोंडतोना दम सुनेत्रा पुष्पमाळा अष्टद्रव्यें पूज्य मूर्ती शुद्ध हृदयी गा सुनेत्रा रम सुनेत्रा

  • रेल गाडी – RAIL GAADEE(TRAIN)

    आभाळ उतरून आल बाई आल बाई वाफेच इंजीन झाल बाई आल बाई रांगेत रंगीत देवघेवी चालताती पाहून दुहितेच हाल बाई आल बाई नाचेल सौदामिनी कशाला रेल गाडी कोंडून सारे सवाल बाई आल बाई मोटार यांत्रीक खेचता वाऱ्यास वेगे उडवीत चेंडू खुशाल बाई आल बाई गागाल गागाल गालगागा गा सुनेत्रा ऐशी लगावून चाल बाई आल बाई

  • माला -MALA(GARLAND)

    हात देण्या नेक ताली राहण्या त्यागिली मी ती रुदाली राहण्या सूर ठेका लय स्वराची साधना गालगागा गा गझाली राहण्या शांत जागा अंतराळी शोधली मौन कर्तव्ये खयाली राहण्या शांतता आत्म्यात माझ्या नांदते निवडली ऐसी प्रणाली राहण्या सत्य मी जाणे सुनेत्रा जाणती माळ माला माल माली राहण्या