Category: Marathi kaavya

  • भोवरा – BHOVARA(VORTEX)

    अधीर मस्त नाचरा समीर मस्त नाचरा ..जमीन मतला अमीर मस्त नाचरा तरंग मस्त नाचरा … हुसने मतला उलगडुनी दले झुले गुलाब मस्त नाचरा बनात शीळ घुमवितो कबीर मस्त नाचरा उन्हात मेघ वर्षला सुशांत मस्त नाचरा नदीत भोवरा गळा जळात भृंग नाचरा उधाणता हवा तळी समुद्र मस्त नाचरा

  • कौमार्य – KAUMAARYA(VIRGINITY)

    मुक्तक ….. १) पंच-इंद्रिये जिवंतपण अंगात भिजविते ज्वलंतपण संगात भिजविते काया आत्मा पंच-इंद्रिये गोम्मटपण रंगात भिजविते मुक्तक २) अंग-अंग अंग अंग न्हाले सुगंध पेरण्या मृत्तिकेत रंग मिसळूनी काळा बाळ माती खाई नजर चोरून रसनेत रसा घोळूनी चाखण्या पंचोळी ३) कौमार्य साधेपण सौंदर्य जाण भो अंतरीचे माधुर्य जाण भो बुद्धीचे चातुर्य जाण भो ….. दर्याचे गाम्भीर्य…

  • शिखर – SHIKHAR(SUMMIT)

    नवनितास कढव खास कुबट वाद मिटव खास….(जमीन मतला) त्या वळ्यास घडव खास गाजतेय गाज खास… (हुस्ने मतला, स्वर काफिया) आम आदमी असून एक बनव दार खास पेन्सिलीतल्या शिशास लीड नाव खास खास इंग्रजीत लीड घेत रोख तो लिलाव खास शीक नीट बोलण्यास लायकी कळेल खास सोक्षमोक्ष लावताच बांगड्या भरेन खास मूर्त मखर नीव शिखर सोनियात…

  • ग्राम – GRAAM(VILLAGE)

    धरण पानशेत छान ग्राम कामशेत छान कमविण्यास दाम बीम धाम हरित शेत छान

  • सोनी – SONEE

    कळ्या फुले गुलाबाची आणि पाने ओवलेली रंगसंगती सुरेख हृदयात साकारली पूर्ण चित्र पापणीत झरझरे वासरीत हवे हवे ते मिळाले जिनदर्शनाने तृप्त लिहीत मी जाता सुचे अर्थ लागे अर्थातून अर्थासाठी अर्थ नवा जगण्याला जीवातून लिही सुनेत्रा सोनु तू सोनी जसे नाव छान मैत्र मैत्री टिकू द्यावी बालपणी गाव एक

  • बॉयलर सूट – BOILER SUIT

    पाश! तुझी ती लोखंडावरची कविता… . वाचलीहं मी!!.. किती किती अन काय बनवतात रे लोखंडापासून.. खरंच लोखंडाची महत्ता अगाध आहे हो… तसा मी पण एक जॉब बनवला होता लोखंडाचा.. स्मिथी मध्ये… टीन एजर असताना.. आणि एक टिनचा बॉक्स पण बनवलेला टिन स्मिथी मध्ये!! बॉयलर सूट बनवून म्हणजे शिवून घेतलेला .. शिंप्याकडून.. मोठ्या हौसेने! स्मिथी प्रॅक्टिकलसाठी…

  • इंच – INCH(UNIT OF LENGTH)

    काही स्फुट अस्फुट चारोळ्या … झीट झकास कांदेपोहे;पेरून कोथिंबीर.. खाऊन जल्दी जल्दी;चक्क मारला तीर.. नारळ फोडून खोवले;खवणीवरती नीट.. करून बर्फी मोदक;आली बाई झीट.. … बाप्ये मिठात पिळुनी लिंबू;कलश घासले धुतले.. भांडे बाजारातील;बाप्ये उठून गेले.. तांब्यापितळेची भांडी;ठिपक्या-ठोक्यांची नक्षी.. ध्यान लावूनी सांजेला;किती बैसले पक्षी.. … इंच सुंदरतेची फांदी;पाने हिरवी कंच.. मुक्या कळ्या अन फुलांसभोती;चाफेकळीचा इंच.. चाफा चंद्रावरती;किरण…