-
काष्ठसुंदरी – KAASHTH-SUNDAREE
वेड लाविते वनदेवांना बाभुळलेली काष्ठसुंदरी झाडे लावी बांधावरती जांभुळलेली काष्ठसुंदरी लिहीत असते काहीबाही पेंगुळलेली काष्ठसुंदरी अर्थ काढते लाख तयातुन काजळलेली काष्ठसुंदरी गोड बोलते साखर पेरित डोईवरती मधुघट पेलित पावत असते पुरुषार्थीना गाभुळलेली काष्ठसुंदरी हाडाची ती काडे करुनी छप्पर घाली घरास अपुल्या घास भरविते बाल जिवांना पेकुळलेली काष्ठसुंदरी विहिरीवरचा रहाट ओढी झरझर सरसर डौलामध्ये सर्वांना पण…
-
पाऊसगाणी – PAAOOS GAANEE
आम्रतरुतळी बसून लिहुया पाऊसगाणी आंबे कैऱ्या बघून लिहुया पाऊसगाणी वनराईच्या तळ्यात डुंबू उडवीत पाणी धरणीवरती पडून लिहुया पाऊसगाणी वारा येता सुसाट धावत पडतील कैऱ्या खात मजेने रमून लिहुया पाऊसगाणी धो धो धो धो पडेल वेडा पाऊस नाचत धारांमध्ये भिजून लिहुया पाऊसगाणी बदके कमळे तळ्यात पोहत गातील गाणी त्यांच्यासंगे सजून लिहुया पाऊसगाणी गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २५)…
-
याड – YAAD
याड असूदे झाड असूदे जपू तयाला ताड असूदे माड असूदे जपू तयाला पोर असूदे अथवा प्राणी घे सांभाळुन गोड असूदे जाड असूदे जपू तयाला मोहर येता आम्रतरुवर राखणीस जा कैरी अथवा पाड असूदे जपू तयाला वेल वाहते भार फुलांचा खोड तिचे मग नाजुक अथवा जाड असूदे जपू तयाला जल भरलेली निळ्यासावळ्या आठवणींची मोळी अथवा बाड…
-
पानगळ – PAANGAL
मनात माझ्या दडले होते स्वप्न मला ते पडले होते जरी संकटे धावुन आली मनासारखे घडले होते स्वतः स्वतःवर केली प्रीती प्रेम स्वतःवर जडले होते पहात होते मी खिडकीतुन उंबऱ्यात ते अडले होते पानगळीचा ऋतू सुखाचा पान पान मम झडले होते जिवंत होती मैनाराणी पंख तिचे फडफडले होते सांग प्रियतमा सुंदर सुंदर रूप कुणाला नडले होते…
-
फुकनी – FUKANEE
चिमटा झारा फुकनी असुदे माय मोडुनी कलम बनविते कोंड्याचा ती मांडा करुनी घास पिलांच्या मुखी भरविते कधी चाक तर कधी अश्वही कधी सारथी माय होतसे चाबुक हाती घेत विजेचा संसाराच्या रथा पळविते आय बाय वा अम्मी मम्मी अनेक रूपे माय वावरे आईची ती आऊ होउन ताक घुसळते तूप कढविते बोट धरोनी शाळेमध्ये वेळेवर बाळांना नेते…
-
अत्तर – ATTAR
फुलात असतो सुगंध जो तो कुपीत भरता होते अत्तर प्रियतम माझा माझ्या संगे प्रीत तयावर माझी कट्टर फुले बाल अन तरुण साजिरी सुकल्यावरती अपसुक गळती त्यांना नसते वृद्धावस्था साठी आणिक वय बिय सत्तर सप्तरंग धाग्यात भरोनी एक सुबकशी विणून पिशवी वह्या पुस्तके मोरपिसे मी तयात भरता होते दप्तर पाषाणाला ठोक ठोकुनी शिल्पी छिन्नीने घडवीता देव…
-
गाठ – GAATH
दशधर्माचे दे रे पाठ चुकांवरी तू मारुन काट वर्षे काही थोडी छाट निवृत्तीचे वय ना साठ कधी न दुखते माझी पाठ मी तर असते सदैव ताठ प्रेमाचा मी चढले घाट साय सुखावर आली दाट कुणी न अडवी माझी वाट स्वागतास दो आले काठ माझ्या पायी झुकते लाट अंतरात ना माझ्या गाठ पक्वान्नाने भरले ताट शुद्ध…