Category: Marathi kaavya

  • धात्री – DHAATREE

    सजुन धीर यात्री मला भेटण्या ये भरुन नीर गात्री मला भेटण्या ये निळ्या लुप्त सीमा तिथे दृश्य मीरा करुन मीरा खात्री मला भेटण्या ये घनी दुग्धधारा धवल चांदण्यांच्या भरुन क्षीर पात्री मला भेटण्या ये पहाटे दवाने पुरी चिंब भिजते म्हणुन खीर रात्री मला भेटण्या ये जिथे गाठ गुंता तिथे मज बुलावा बनुन तीर कात्री मला…

  • फुलझड्या – FUL ZADYAA

    नको करू तू नको फारसा विचार माझा नको दाखवूस कोठे बसला प्रहार माझा थकले आता प्रहार करुनी विचार करुनी नको वाटते कुणी करावा पुकार माझा मला वाटते सर्व सोडुनी जावे का मी कुठे जायचे जिथे तिथे बघ तिहार माझा जीव गुंतला फुलांमधे या कसा सोडवू कसा द्यायचा गोड फुलांना नकार माझा पुणे सांगली साताऱ्याला जाणे…

  • सामान – SAAMAAN

    देऊन टाकले मी सामान राहिलेले माझे मला पुरे हे ताबाण राहिलेले मी बोलले तुला जे होते जरी पुरेसे उरलेत कागदी हे वाग्बाण राहिलेले मज वेड गझल लावी अन भावनेत भिजवी भरते अता सुखाने ते पान राहिलेले माझ्यासवे रहा रे मम वेग पाहण्या तू धुंदीत काम करण्या बेभान राहिलेले जिन मंदिरी पहाटे निर्वाण कांड पाहू करण्यास…

  • दर्दी – DARDEE

    वेताळ वाडी पाताळ माडी वेताळ वाडी आभाळ माडी सोन्यात भारी लेण्यास बांधू वेताळ वाडीचा काळ माडी बोलून होता मौनात सांडे वेताळ वाडी वाचाळ माडी तोंडास काळे फासून नाचे वेताळ वाडी नाठाळ माडी वेल्हाळ गोष्टी खोट्याच सांगे वेताळ वाडी पाल्हाळ माडी येण्यास सोटे बाहेर सारे वेताळ वाडीला जाळ माडी राखेतुनी घे आता भरारी वेताळ वाडीचा माळ…

  • नाचले – NAACHALE

    जपण्यास मी काही फुले बहरात त्यांच्या नाचले ओलावण्या दाही दिशा मखरात त्यांच्या नाचले वाचाळता होती खरी जाणून तेव्हा थांबले मौनातल्या ओठांवरी अधरात त्यांच्या नाचले रानातल्या मातीत मी पेरून काही पाहिले होते जरी खेडे भले शहरात त्यांच्या नाचले माझेच होते काव्य ते पण का अशी भांबावले मुखपृष्ठ होते कैक पदरी कव्हरात त्यांच्या नाचले अवघड जरी वेळा…

  • “काहीहीहां श्री” – KAAHEEHEEHAA SHREE

    ती मूढ जान्हवी हेकट जानू बाई आंधळी जाहली वृद्धा कानू बाई मृदु माय सावली भूतकरांची माता पण तीच गुणाची पणती तानू बाई फुलमाळ जयाची गळा घालण्यासाठी सानशी खार ती धावे चानू ताई कैवल्य चारुता मीर चंद्रमा दावी तंबोरा जुळवी मीरा गानू बाई बोलते सारखे, तुज “काहीहीहां श्री” भानावर ये श्री… म्हणते भानू बाई मात्रावृत्त –…

  • वेताळ – VETAAL

    आम्ही वेताळ वेताळ जोडू आकाश पाताळ पोसू नारळ बागांना करत काम नि धिंगाणा नारळ विकून बाजारी फेडू मागची उधारी मस्तीत दावत तेगार घालू पालथा बाजार पायपूसणी मोलाची खऱ्या प्रीतिच्या तोलाची बाजारी विकत घेउया डोंगरी झऱ्यात धुवूया कुटाळ कर्मे जाळूया धर्म दिगंबर पाळूया जंगल पाताळ बाजार समुद्र आकाश शेजार सुंदर शेजी शेजारी कटेल खोटा व्यापारी मात्रा-१४