-
अग्गो – AGGO
पृथ्वीवरची सून व्हायचे स्वप्न परी बघते आकाशी सूर्यासंगे ती तापाया बसते दसरा सण मोठा आल्यावर दिसे निळावंती झेंडू चाफा शेवंतीचा ढीग उभा करते सासूबाई कडक दामिनी ढग्गोबाईची अग्गो वहिनी नणंद ताई खुदूखुदू हसते नक्षत्रे अन चंद्रासंगे निशा गीत गाई तरणीताठी कृष्ण चांदणी नभात चमचमते धूमकेतु अन इंद्रधनूवर बसून झुलताना गझला लिहिण्या बॉन्ड “सुनेत्रा” कधीच ना…
-
आड -AAD
पुन्हा बहरले कळ्याफुलांनी झाड सुबक ठेंगणे पुन्हा सजविले रहाट लावुन आड सुबक ठेंगणे उंच पोफळी नारळ बागा साद मला घालिती माझ्याशी बोलाया झाले माड सुबक ठेंगणे बांध बासनी ग्रंथ पुराणे अन पुस्तक रंगीत वाचायाला पाठवून दे बाड सुबक ठेंगणे तपवायाला दुग्ध चुलीवर मंदाग्नी असूदे ठोक्याचे घे पात्र स्टीलचे जाड सुबक ठेंगणे विरजवुनी कोमट क्षीराला ठेव…
-
गुंजन – GUNJAN
आलिंगन हे दोन फुलांचे की चुंबन आहे नको नकोचा मस्त बहाणा की लंघन आहे गोष्ट जुनी ती आठवलीका नवी सदा वाटे गोष्टीमध्ये सारवलेले बघ अंगण आहे प्राजक्ताचा परिमल लहरे वाऱ्याशी खेळे सुमने वेचित किणकिणणारे तव कंकण आहे रांगोळीचे जोडुन ठिपके चित्र एक रेखू घर कौलारू सताड उघडे फुल-कुंपण आहे परसामध्ये गाय हम्बरे हुंदडते वासरू मुक्त…
-
नय दृष्टी – NAY DRUSHTEE
-
पत्र पीयूष – PATRA PEEYUSH
जपुन ठेवले अजुन अंतरी तुझ्या स्मृतींचे पत्र पीयूष जरी जाळले जरी फाडले पुरून उरले पत्र पीयूष अता न चिंता कशाकशाची पार जाहली सर्व संकटे सदा सुखाने जगावयाचे हृदयी भिजले पत्र पीयूष पऱ्या देवता रानपाखरे किलबिल त्यांची झाडावरती शिंपित उधळित दवबिंदूसम पानांवरले पत्र पीयूष गुणांस वाचत सुचल्या गोष्टी जादुई वनदेवींच्या मज त्यांस गुंफता कुसुमांभवती बनले गजरे…
-
इमान इतबरे – IMAAN ITABARE
-
ब्रम्हवादिनी – BRAMHAVAADINEE
ब्रम्हवादिनी तू जैनांची प्रथम ब्रम्हचारिणी अग्नीमध्ये तापवून घे कलम ब्रम्हचारिणी मिळव संपदा मुक्तीसाठी स्वधर्मास जाणुनी शुभ्र लेउनी वसन दिशांचे तलम ब्रम्हचारिणी मोक्षप्राप्तिचे शरीर साधन श्रमण संस्कृती म्हणे जीव जगाया किंचित होना गरम ब्रम्हचारिणी जरी ठेविले थंड मस्तका हृदय नीर तापते अशा प्रसंगी ठेव भावना सुगम ब्रम्हचारिणी रक्षण करण्या दिगंबरांचे सिद्धायनी देवी जिनानुयायी ब्राम्हसुंदरी प्रशम ब्रम्हचारिणी…