-
डंख – DANKH
चेहरे दो दो इतुके मोहक बासरीचे दो पंख जणू आरशामध्ये प्रतिमा लोभस आगगाडीची लिंक जणू वर्षतो धो धो मुखपृष्ठावर श्रावणीचा पाऊस निळा अक्षरे पानी गुलकंदासम लेखणी गाळे इंक जणू धूर वायूचे उठता वादळ अडकित्त्याने काप मणी त्यातला काटा फुरसे घोणस नागिणीचा मी डंख जणू ढोकळा पिझ्झा कटलेटावर ताव मारूया आज पुन्हा सारवू मोठे तिरके अंगण…
-
बनेन दाता – BANEN DATA
उत्तम शुचिता धर्म ओळखुन नमू जिनाला मर्म ओळखुन पर्युषण हे पर्वच प्रिय मज बनेन दाता कर्म ओळखुन
-
शिरोमणि – SHIROMANI
जळात मी मन मंदिर माझे रेखांकित केले लहरींवरती तरंगणारे उभे शिल्प केले शांत पीत जल लाटांवरती हरित नील धरती पंच शिखरयुत राउळातल्या घंटा झांजरती अवती भवतीचे मोक्षार्थी नर नारी सुंदर नीर नदीचे संथ वाहते त्यात झुले अंबर देउळ की हे जहाज अपुले शिखर कळस हृदया तीर्थंकर चोवीस शिरोमणि बेल पळस हृदया
-
घड्याळ अंबर – GHADYAL AMBAR
चोविस ताशी घड्याळ अंबर मला दावते जिन तीर्थंकर शून्य प्रहर रात्रीचे बारा लख्ख झळकतो तारा तारा वृषभनाथ तीर्थंकर पहिले एक वाजता मजला दिसले अजितनाथ तीर्थंकर दुसरे दोन वाजता सुनेत्र हसरे संभव जिन तीर्थंकर तीज तीन वाजता लखलखे वीज अभिनंदन जिन चवथे भगवन चार वाजता त्यांचे दर्शन पंचम तीर्थंकर सुमती जिन पाच वाजले हृदयी किणकिण पद्मप्रभू…
-
सुमार भाव – SUMAR BHAV
मधुर फळे अती कडू तुझ्यामुळेच जाहली बिया जरी न जून त्या मुळे खिळेच जाहली सुरुंग लावुनी भुईत ध्वस्त टेकडी दिसे इमारती नव्या उभ्या तळी बिळेच जाहली उन्हात वावरे फिरे थकून जाय रोज ती वहायचे खळाळुनी तरी तळेच जाहली नयन निळे नजर खुळी पडून पाकळ्यांवरी फुलांवरील अष्टगंध अन टिळेच जाहली सुमार भावसंपदा तरी म्हणे परीच मी…
-
कृतज्ञ – krutdnya
कृतज्ञ मीही सुंदर सृष्टी सुंदर माझी सुंदर मुले डोळे माझे वीज अंबरी त्यावर अंतर झुले पूर्वजन्मिची पुण्याई मम जन्मोजन्मी वसे त्याचमुळे मम पूर्ण छबीही इतुकी मोहक दिसे अब्जाधिश मी आज जाहले सौख्य संपदा खरी हृदयी माझ्या आत्मप्रियाची वाजतसे बासरी पूर्ण देश अन पूर्ण जगाच्या सफरीला जाण्यास सज्ज जाहले कुटुंब माझे मोदाला लुटण्यास हवे हवे जे…
-
पाना – Pana
छायाचित्रांवरती माझ्या कैक तारका फिदा खुद्द माझियावरती मरती खलनायक पण सदा स्वरुप मनोहर तेजस कांती झळाळते मम दिव्य झोपडीत मम माझे गुरुजन येतिल सारे भव्य पुत्र आणखी कन्या माझी हृदयीची दो रत्ने मात-पित्यांना गुरू मानुनी मोक्ष मिळविती यत्ने बिजागरीशी जोडुन नाते नट नि पाना माझा बोल्ट आवळुन झाकण बसवी वाजवीत ग बाजा शशांक मधुरा सुभाषसंगे…