-
पत्र पीयूष – PATRA PEEYUSH (divine elixir)
जपुन ठेवले अजुन अंतरी तुझ्या स्मृतींचे पत्र पीयूष जरी जाळले जरी फाडले पुरून उरले पत्र पीयूष अता न चिंता कशाकशाची पार जाहली सर्व संकटे सदा सुखाने जगावयाचे हृदयी भिजले पत्र पीयूष पऱ्या देवता रानपाखरे किलबिल त्यांची झाडावरती शिंपित उधळित दवबिंदूसम पानांवरले पत्र पीयूष गुणांस वाचत सुचल्या गोष्टी जादुई वनदेवींच्या मज त्यांस गुंफता कुसुमांभवती बनले गजरे…
-
इमान इतबरे – IMAAN ITABARE (with complete loyalty and integrity)
-
ब्रम्हवादिनी – BRAMHAVAADINEE (“one who speaks about bramha”)
ब्रम्हवादिनी तू जैनांची प्रथम ब्रम्हचारिणी अग्नीमध्ये तापवून घे कलम ब्रम्हचारिणी मिळव संपदा मुक्तीसाठी स्वधर्मास जाणुनी शुभ्र लेउनी वसन दिशांचे तलम ब्रम्हचारिणी मोक्षप्राप्तिचे शरीर साधन श्रमण संस्कृती म्हणे जीव जगाया किंचित होना गरम ब्रम्हचारिणी जरी ठेविले थंड मस्तका हृदय नीर तापते अशा प्रसंगी ठेव भावना सुगम ब्रम्हचारिणी रक्षण करण्या दिगंबरांचे सिद्धायनी देवी जिनानुयायी ब्राम्हसुंदरी प्रशम ब्रम्हचारिणी…
-
जिती – JITEE(alive)
ब्रम्हकमळ मम हृदयी फुलण्या शुद्ध शुद्ध हो तू भूमीमध्ये सत्य पेरण्या शुद्ध शुद्ध हो तू पर्युषणातिल दशधर्मांची शिडी चढायाला जिनधर्माची मेढ रोवण्या शुद्ध शुद्ध हो तू नकोस भटकू अंधारी या लाव दीप आता अंतर्यामी दिवा उजळण्या शुद्ध शुद्ध हो तू साक्षीभावानेच पहावे कर्मकांड सारे कांडामधले मिथ्य जाणण्या शुद्ध शुद्ध हो तू मातृधर्म हा स्वभाव जपण्या…
-
जा जा मूढे – JAA JAA MUDHE (“go,go, you fool”)
नकोच नाटक जा जा मूढे पुरे जाणले होते तुजला मी तेव्हाही अन आताही जाणत आहे वेळ यायच्या आधी नसते बोलायाचे म्हणुन बोलले कुणास नाही मन आताही जाणत आहे एकटीच का होती बसली निळावंतीसम तप्त दुपारी सोंग घेउनी विवाहवेदी वरती सजुनी ताप तापली हलकी झाली ढगात गेली जलदामधुनी कुठे बरसली घन आताही जाणत आहे शृंगाराने हुरळुन…
-
पण नको कुरवाळणे ते – PAN NAKO KURAVALHANE TE
-
धोंडा – DHONDAA
कशाला हेवेदावे करण्या भांडण तंटे कशाला कपटी कावे करण्या भांडण तंटे उशाशी धोंडा खाण्या कोंडा आवड ऐसी कशाला कोणी यावे करण्या भांडण तंटे शिव्यांचा मारा गुटका मावा यातच जगण्या कशाला दारू प्यावे करण्या भांडण तंटे मनाची शुद्धि आत्मानंदी आपण सैनिक कशाला राजे व्हावे करण्या भांडण तंटे सुनेत्रा नावे गझला लिहिते आनंदाने कशाला कोणा खावे करण्या…