-
कातर वेळी – KAATAR VELEE
दाटन येता स्मृती अंतरी कातर वेळी रडून घे तू मुक्त मोकळे कातर वेळी नकोस दाबू भाव भावना घुसमट होता लाव दिवा तू देवापुढती कातर वेळी बोल मनाशी बोल प्रियेशी बोल फुलांशी सांडुन अश्रू लिहित राहा तू कातर वेळी लिही आणखी फाड हवे तर लिहिलेले तू सुचेल सुंदर अधिक त्याहून कातर वेळी तिन्हीसांजेला संधिकाल म्हण हवे…
-
काकतालीय – KAAK TAALEEY
काकतालीय न्यायाने सुख न कुणा मिळते अंतर्दृष्टी ज्याची उघडे सुख त्याला मिळते जीव मुमुक्षू मुक्तीला उत्सुक मिळवाया विपरीतरुपी मिथ्यात्वा परिक्रमा मिळते आस्वादाने प्रत्यक्षे इंद्रिय सुख लाभे शब्दफुलोरा रचल्याने कधीच ना मिळते दगड फेकता शांत तळी वीचिमाला त्यात संकल्पाने विकल्प धन चित्ताला मिळते शरीर सुंदर कुरुप असो व्यक्ती ना तैशी सत्य शिव रुपी चित्ताला सुंदरता मिळते…
-
स्वधर्म – SWADHARM
मृत्यूनेही मान झुकविली ओशाळून नाही सलाम केला वीरत्वाला झाकोळून नाही मृत्यूंजय तो शंभू राजा वंदू त्या आत्म्याला स्मरणी ठेवू गाथा त्याची जगास कळण्याला धर्म देश अन स्वधर्म जपण्या झुंज दिली त्याने फितूर झाले भ्याड तयांना संपविले त्याने धडा शिकविला त्या भ्याडांना कवटाळून मृत्यू आत्मशत्रूला जिंकत गेला अमर्त्य अमुचा शंभू शिवरायाचा अमर पुत्र हा शिवरायासम शूर…
-
चंद्र सूर्य – CHANDR-SURYA
सूर्याच्याही आधी उगवे आत्मसूर्य माझा चित्तामधल्या अंधाराची संपविण्या बाधा साधा माझा सूर्य तप्त पण चंद्रासम शीतल आहे चंद्रही माझा शांत शांत पण सूर्यासम तेजस आहे आत्मचंद्र पूर्वेला उगवे पुनवेच्या रात्री अंधाराला करे सुशोभित लहरुन गात्री गात्री चंद्र सूर्य मम दोन नेत्र हे निश्चय अन व्यवहार दो नेत्रांनी बघत बघत मी करेन हा भव पार तटावरी…
-
पर्याय तम छाया आतप उद्योत – PARYAAY TAM CHHAAYAA AATAP UDYOT
तम म्हणजे पुदगल द्रव्याचा सप्तम पर्याय तम म्हणजे काळा काळा अंधकार घन होय अष्टम पर्यायी छाया ती दो प्रकाराची तदवर्णपरिणत अन प्रतिबिंब उपप्रकाराची दिसे रंग रुप जसे तसे ते तदवर्णपरिणत केवळ छाया उन्हात पडते ते म्हण प्रतिबिंब पुदगल द्रव्याचा आतप हा नववा पर्याय सूर्य प्रकाशालाही म्हणती आतप वा ऊन चंद्राचा जो प्रकाश शीतल उद्योत आहे…
-
पर्याय संस्थान – PARYAAY SANSTHAAN
पुदगल द्रव्याचा जाणू पंचम पर्याय नाम तयाचे संस्थानं वाच पुढे काय संस्थानाचे नाव दुजे आहे आकार आकाराने होत असे रूपे साकार इत्थं लक्षण संस्थाना म्हणती पहिला प अनित्य लक्षण संस्थान प्रकार दुसरा दु लांब रुंद गोल कोनयुत कितीक आकार वर्णन करण्या सहजपणे होती साकार मेघ नभातिल बाष्पाचे नियमित ना रूप अशक्य करणे वर्णनही अनियमितच रूप…
-
स्थूलपणा पर्याय STHUL-PANAA PARYAAY
स्थूलपणा पुदगल द्रव्याचा चौथा पर्याय सूक्ष्मपणासम ढोबळ त्यातिल प्रकार दो जाण सर्वांमध्ये अधिक स्थूल जो समस्त जगतात जगास व्यापे पूर्ण असा जो तोच महास्कंध आंब्याहुनही स्थूल खरबूज त्याहुन टरबूज टरबूजाहुन स्थूल शोधण्या आपेक्षिक स्थूल महास्कंध अन आपेक्षिक हे विभाग दो जाण स्थूलपणाला जाणायाला उपयोगी फार २५ मात्रा