-
शब्दबोली – SHABD-BOLEE
भाषारूप नि रूप अभाषा, यांच्याद्वारे शब्द उमटती.. शब्दाशब्दामधले अंतर, अंतरात त्या भाव प्रकटती… भाषारुप शब्दांच्यामध्ये, अक्षररूपी मनुष्य बोली.. चिव चिव बें बें खग नि पशूंची, रूप अनक्षर उपजत बोली… रुपी अभाषा स्वरुप शब्द दो, प्रायोगिक अन स्वाभाविकही.. पुदगल शब्दांचेच भेद हे, चर्चा करता पर्यायाची… मनुज छिन्नीने दगड फोडतो, ध्वनी उमटतो, तो प्रायोगिक.. मेघ वीज वा…
-
अंतरीचा सोनचाफा – ANTAREECHAA SONCHAAFAA
अंतरीचा सोनचाफा तू तया पाहून घे सौरभाला लूट त्याच्या कुंतली माळून घे कुंतलांना सांग कुरळ्या वारियावर लहरण्या मोकळे होऊन त्यासम मस्त तू गाऊन घे नीर शीतल साठलेले लिंब हो काठावरी चंद्रकिरणांच्या सरींनी चिंब तू न्हाऊन घे सोडुनी पाण्यात पाया बैस तेथे क्षणभरी विसरलेल्या पैंजणांना तू पुन्हा बांधून घे बिंब तव पाण्यात सुंदर पाहुनी आश्चर्य का…
-
वनदेवी – VAN DEVEE
बकुळ फुलांच्या अगणित राशी तळी साठल्यावरी परिमल जाई वाऱ्यावरुनी वनदेवीच्या घरी वनदेवी मग निघे तरुतळी परिमल प्राशायास सुगंधात त्या वनास अवघ्या भिजवाया भिजण्यास अर्ध्या वाटेवरती भेटे तिज वेडा पाऊस अडवुन तिजला म्हणे मैत्रिणी नको तिथे जाऊस मृदगंधाला लुटून पुरते चल लोळू मातीत खळखळणाऱ्या ओहोळांचे ऐकूया संगीत धारेसंगे खेळत फुगडी दाव निराळा बाज मजेमजेने चरण्यासाठी उन्हात…
-
संशोधन – SANSHODHAN
संशोधन वा असो माहिती मला न कळलेली आता आता मला मिळाली थोडी जळलेली आवडल्यावर समजुन घेणे ही प्रीती असते अनोळख्याला समजुन घेणे अवघड भलते असते गुणगुणता मी अधरी आली ओळ सहज सहज … भलते सलते अर्थ कशाला डोक्याला ताप … .
-
आज गाऊ दे – AAJ GAAOODE DE
आज गाऊ दे मला प्रियतमा मुक्त मनाने काही मला न वाटे भलते काही तुलाच भारी घाई मी न कुणाला पुसले काही मी न कुणावर रुसले वेड्या हट्टापायी माझ्या कुणास ना मी छळले मी माझ्यातच रमले इतुकी आत आत वळले मूर्त तुझी पाहुनी तिथे मी आनंदे रडले काव्यसखीचे बोट धरोनी भवती तुझिया फिरले फिरता फिरता तुला…
-
मुहूर्त – MUHOORAT
बोलायाचे लिहावयाचे मुहूर्त ठरवे कोणी पोळी भाजी सुद्धा भरवे चमच्याने कोणी नजर सांगते नकोच चमचा अधर घट्ट मिटले उघड पाकळ्या सोड मौन तू अता तरी गझले
-
इडली डोसा – IDALEE DOSAA
इडली डोसा खमंग आप्पे अथवा सुरळी वड्या नको दाखवुस लालुच असली उघड आतल्या कड्या मनीमाऊला चीज हवे रे तेही ताजे ताजे नकोच उंदिर सोडच त्याला पीसी च्या मागे