-
जय जया जय – JAY JAYAA JAY
जय जया जय जयघोषाने जय ना होय कधी हर्ष हर्ष हा शब्द जपत रे हर्ष न होय कधी हर्ष व्हावया विजयी व्हाया जप तू प्रीतीला खऱ्या खऱ्या भावना रांगड्या उतरव लढतीला
-
सर्पफणा – SARP-FANAA
सर्पफणा सावली देतसे तपोलीन मुनीस सिंह म्हणे मी शूर तुझ्यासम वीर क्षत्रियास जलचर जीवा करुन मोकळे नित्यच शंखध्वनी नीलकमल फुल नयन जलातिल नमिते मी त्यांस कासव कणखर मुनी उभयचर सुंदर व्रतधारी पुफ्फ मल्लिगा कुंभातिल जल देई पानांस अर्हतधर्मी व्रती साधुचे अभयदान मीना तृणमय कुंथळ सुरभित गिरिवर बकऱ्या चरण्यास निर्झरकाठी हरिण दौडते शांती रानात वज्रासम धनु…
-
प्रेमभावे – PREMBHAAVE
सुचत जाते काव्य मजला लिहित जाता प्रेमभावे नित्य नेमी घाट अवघड चढत जाते प्रेमभावे हृदय बोले अंतरीचे बोल काही साठलेले दूरवर रानात वेणू वाजवी कुणी प्रेमभावे भोवताली कोण आहे भान का ठेवू अता मी फिरत राही चक्र नेमे फिरविता मी प्रेमभावे वृक्ष वेली डोलताती पाखरे गातात जेव्हा अक्षरेही सजीव होउन नाचताती प्रेमभावे प्रेमभावाविन न मुक्ती…
-
आज वाटते- AAJ VAATATE
आज वाटते पाऊस यावा माझ्याहुनही चिंब भिजावा थेंब टपोरे मौक्तिक झरझर केसांतुन यावे गालावर जुनी पुराणी छत्री तरीही पुन्हा धरूया तिज डोईवर तशात येता सुसाट वारा वेचाव्या छत्रीतच धारा हातगाडीशी थांबुन क्षणभर कणसे खावी चोळुन मिरपुड रस्त्यावरती पाणीच पाणी गाऊ रचुया पाऊस गाणी येईल पाऊस येईल पाऊस रडविण्यास त्या वेड्या भाऊस
-
काव्यजल – KAAVY-JAL
माय मराठी प्राणाहुन प्रिय मरगठ्ठे जन गर्जा जय जय कुंडलिका अन नीरा पवना मुळा मुठा वारणा कोयना महाराष्ट्र मम सुजला सुफला शिवबा शंभू जेथे लढला कभिन्न कातळ फोडित पत्थर स्वच्छ जले झुळझुळती निर्झर ज्ञानदेव नामा तुकयाची अभंग गाथा ओवी साची पुणे मुंबई मावळ डगरी खऱ्या शोभती उद्यम नगरी वाऱ्या वाऱ्या घुमव बासरी ओत काव्यजल भरुन…
-
पथ हा निर्जन – PATH HAA NIRJAN
पथ हा निर्जन स्वच्छ मोकळा पिवळ्या पुष्पांनी सजलेला पुढे दुतर्फा वृक्ष देखणे पर्ण रहित घन गर्द फुलोरा दूर दूर पथ कोठे जाई भेटायाला कुठल्या गावा स्वच्छ बाकडी सुनी सुनी ही कुणी न त्यावर बसावयाला धरणीवरती श्याम सावळ्या आकाशाची निळसर छाया पीत फुलांचा सडा भूवरी झुळूक स्पर्शते हरित तृणाला कोणासाठी कुणी बनविला सुंदर झुळझुळता हा रस्ता
-
मिसळ मिसळ – MISAL MISAL
मिसळ मिसळ तू मिसळ भावना पुदगल शब्दांमधे भरत भरत तू अर्थ नेमके अनवट शब्दांमधे घुसळ घुसळ तू साय दह्यातिल लोणी काढायास तूप कढवुनी ओत त्यास तू कडवट शब्दांमधे फुलव फुलव तू फुलव मनाला येण्या खुदकन हसू हनुवटीवरची खळी रुतुदे अडमुठ शब्दांमधे उडव उडव तू घरभर चेंडू मनात टप्पे मोज मनातले तेवढेच टप्पे उतरव शब्दांमधे भरव…