Category: Marathi kaavya

  • बिंब – BIMB

    जेव्हा प्रिय मम डोईत घुसते नशा तयाची चढते चढते पुरती मी मग वेडी बनते अप्रियांचे वेड काढते अन प्रियांना वेड लावते… डोईमधल्या अनंत खोल्या गडद जांभळ्या पडदेवाल्या खोल्यांमध्ये प्रिय मग शिरते सामानाला विखरुन देते बंद कपाटे उघडुन सारी सामानाला विखरुन देते विस्मृतीतल्या घड्या चाळते दुःखालाही चिडवित बसते चिडवुन चिडवुन रडव रडवते रडताना मग खो खो…

  • मिसळ – MISAL

    कधी खावी मिसळ कधी मटकी उसळ मटकी मोडाची मैत्रीण लाडाची मैत्रीण गोरटी नजर चोरटी नजर लागली बाहुली सुकली बाहुली नकटी सुंदर छाकटी सुंदर सुंदर कित्ती बिलंदर बिलंदर माऊ चल साय खाऊ साय आणि साखर मायेची पाखर मायेचं माहेर माहेरची वाट वाटेतला घाट घाटातली झाडी झुकझुक गाडी गाडी गाते गाणे पाखरू दिवाणे …….  

  • अनोळखी – ANOLAKHEE

    कुणी तरी का तुला म्हणू मी अनोळखी का तुला म्हणू मी फुलाप्रमाणे हृदय तुझे हे जडी बुटी का तुला म्हणू मी सदैव असशी मनात माझ्या जळीस्थळी का तुला म्हणू मी मधुघट अक्षय मला दिले तू कडू गुटी का तुला म्हणू मी सलील निर्झर प्रपात असुनी दरी गिरी का तुला म्हणू मी नवमत वादी विचार तू…

  • तिन्हीसांज – TINHEESAANJ

    सकाळी दुपारी लिहावी गझल तिन्हीसांज होता स्मरावी गझल गझल रडव रडवी कधी गाउनी हझल मग लिहावी पुसावी गझल रदीफास टाळे गझल जेधवा म्हणे काफिया मग हरावी गझल पहाटे प्रभाती सकाळी सजल दवाने उन्हाने नहावी गझल लहर वारियाची अधर चुंबिता मिटावी फुलावी झुलावी गझल नयन कारण व्हावी तनू कापरी तिच्या कंपनांनी टिपावी गझल झरझरा खिरे ज्ञान…

  • सर – SAR

    “नखाचीही सर नाही तुजला, सत्यवान प्रिय सावित्रीच्या”; म्हणते कोणी विजेस जेव्हा, वीज कडकडे ढगामधुनी… वीज म्हणे मग त्या कोणाला, “कसला रे तू मूढ बावळा?” ‘सर ना माझ्या नजरेची या कधीच ना रे कुणास आली नखात साठे घाण म्हणोनी नजरेने मी नखे जाळली”””…

  • बाबा – BAABAA

    बनायची आई दुर्गा अन बनायचे बाबा मग आई। “उठू नको तू भल्या पहाटे” म्हणायचे मज “झोपच बाई”। बूट करोनाचे मज घेण्या हिंडायाचे पायी पायी। म्हणायचे मज इमाम वेडा ऐकून माझी बडबड गाणी। ‘पाकीट पैसा’ मला द्यायचे हौसेखातर माझ्या काही। रडायचे मी जेव्हा जेव्हा उडायची बाबांची घाई। गेल्यावरती निघून बाबा दिसती बाबा ठाई ठाई। बाबा गेले…

  • केळीचे हे बाग – KELEECHE HE BAAG

    केळीचे हे बाग कशाने अवचित सुकले? नजर लागली केळफुलाला म्हणून सुकले. म्हणून सुकले गीत कोणते अखंड बन हे? परवशतेचे गीत गाउनी सुकले बन हे. परवशता ही एक गुलामी तोडुन तिजला. . स्वतंत्र होउन मुक्त गातसे बन केळीचे…