Category: marathi kavya

  • जवस – JAVAS

    पुनव ना मी अवस आहे ना कुणाची हवस आहे चढविशी का पाक मजवर तीळ ना मी जवस आहे

  • स्वभाव – SWABHAAV

    फुलाप्रमाणे कोमल सुरभित वज्रासम खंबीर स्वभाव मुक्तिपथावरच्या आत्म्यांचा शूर वीर अन धीर स्वभाव धर्म अहिंसा शाश्वत जगती बिंबविण्या आचरणातून मन वचने कायेतुन झळके शुद्ध अहिंसक मीर स्वभाव पुण्याईने मनासारखे घडते जेव्हा सारे छान जणु काचेच्या पात्रामधले मधुर सुवासिक क्षीर स्वभाव यौवन धन सत्तेची मदिरा चढते जेव्हा मस्तिष्कात उतरविण्या ती मादक धुंदी होतो वेडा पीर स्वभाव…

  • गारुडी – GAARUDEE

    सूर ताल अन लय असताना लय असताना गाणे गावे भय नसताना लय असताना अधरीच्या वा लिहिल्या गाण्या यंत्र पकडते मंत्र भारली सय हसताना लय असताना चारित्र्याची ऐशी तैशी म्हणे गारुडी पुद्गल शब्दां मय डसताना लय असताना निश्चय काही करू न शकला बघत राहिला व्यवहाराचा नय फसताना लय असताना जय जय जय वा जैकाराचा घोष दुमदुमे…

  • कामे – KAAME

    इतुके लिहुनी नकोस टाकू टाकुन टाकुन दमशील ग इतुके गझले नकोस झाकू झाकुन झाकुन दमशील ग वाकून तू ग करिशी कामे दिवसरात्रभर किती किती इतुके बाई नकोस वाकू वाकुन वाकुन दमशील ग

  • नुक्ता – NUKTAA

    हिंदी उर्दू ग़ज़लेमध्ये नुक्ता भारी मराठीतला शब्द स्वस्त मग सस्ता भारी गज्जल झाली गजल गज़ल अन गझल शेवटी या नावास्तव काढल्यात मी खस्ता भारी लगीनघाई खरीखुरी ही आली बाई गझलदालनी काढ भरजरी बस्ता भारी रम्य हवेली माझी आहे तिथे जातसे वळणावळणाचा गाणारा रस्ता भारी तिरंग्यातल्या रंगी बुडवुन इथे सुनेत्रा फिरव लेखणी सहज उमटण्या मक्ता भारी

  • बाण वायू – BAAN VAAYOO

    ग्रास मुखातिल उदरी नेई निळसर हिरवा प्राण वायू रक्ताभिसरण सहज करितसे लाल तांबडा व्यान वायू विनय नम्रता सौजन्यादि भाव वाहता अंतरातले मस्तिष्काला शांत ठेवतो धवल निर्मल उदान वायू दृष्टी वाचा तनमन बुद्धी इंद्रियांसह तोल साधण्या देहामधल्या मळास ढकले कृष्ण श्यामल अपान वायू उदरामधले अन्न पचविण्या लोहाराचा जणू भाता अग्नी फुलवे नाभीमधला पीतवर्णी समान वायू भूमीवरती…

  • चुक्ती – CHUKTEE

    केल्यावर तुज सक्ती मीही बाकी केली चुक्ती मीही खूप पाहिली वाट म्हणाया हवीच मजला मुक्ती … मीही नवल वाटते दगडाचीही केली होती भक्ती मीही स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वाढविली मम शक्ती मीही नाव ‘सुनेत्रा’ सिद्ध कराया कधी करितसे युक्ती मीही