Category: marathi kavya

  • जुगलबंदी – JUGAL BANDEE

    पाऊसधारा जश्या बरसती तसेच बरसावे शेरांनी वीज कडाडून मेघ गरजती तसेच गरजावे शेरांनी नीरक्षीराच्या घटाघटांतुन भूमीला अभिषेक कराया ढोल वाजवीत घननीळाच्या करांस पकडावे शेरांनी मनमयूराचा रंगपिसारा उलगडताना अर्थ भाव घन जाणीवेतील शब्दास्त्रांना लयीत परजावे शेरांनी अडगळ असूदे जुनी पुराणी ऊन द्यावया तिला श्रावणी नेणीवेतील जिने बिलोरी चढून उतरावे शेरांनी आभाळातून थेंब टपोरे जळात पडता तरंग…

  • टॅटू – TATTOO

    बाई सुया घे गं दाभण घे …या जुन्या लोकगीताच्या चालीवर आधारित नवे गीत बाई सुया घे गं दाभण घे …. टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….(धृ. पद) कुरळ्या केसांच्या हौसाबाई डोकं धुवाया घ्या शिकेकाई दुखऱ्या फोडावर धोंडामाई लावा शेकुन बिब्बा बाई झाडाल वाडा मग बावन खणी … टिकल्या घ्या कुणी…

  • भ्रमर भृंग – BHRAMAR BHRUNGA

    In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love. भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे केकारव नको अता हवी बांग नाथा निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी शब्द निळे…

  • जिनवाणी – JINVAANI

    In this poem the poetess says, Jinvaani is our mother. गर्जा जयजयकार जिनांचा गर्जा जयजयकार क्षमा धर्म हे भूषण अमुचे त्यागू क्रोधास त्याग तपाची परंपरा ही आगम धर्मात हृदय शुचिता शुभ्र जलासम मनात खळखळणार जिनवाणी ही माय आमुची धर्मामृत पाजे तिच्या तनूवर मार्दव आर्जव अलंकार साजे माय शारदा गुरूमुखातून अखंड झरझरणार भूल न पाडिती अम्हास…

  • शिशिर ही फुलला – SHISHIRAHEE FULALAA

    This poem is a song of various seasons in India.  Every season has it’s own beauty. We must enjoy these seasons. प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला वसंत वर्षा सावध सावध शरद बोचरा करितो पारध हेमंताने केले गारद गुलमोहर खुलला प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला विरह कसा मी साहू आता खरेच जवळी राहू आता प्रेमामध्ये न्हाऊ…

  • पुस्तक – PUSTAK

    This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…

  • शारदीय सप्तसूर – SHAARADIYA SAPTASOOR

    In this poem the poetess describes pleasant atmosphere and state of our mind in various seasons. आत्ममग्न शिशिराला जागविते ध्यानातून वसंताची प्रीत गाते कोकिळेच्या कंठातून केतकीच्या गर्भापरी हेमंत हा सोनसळी ग्रीष्म सखी तापवूनी बुडविते सांज जळी मेघदूत आषाढाचे नभातील खगांपरी उत्तरीय काळेनिळे उडे बघ वाऱ्यावरी धारा झरे झरझर बागडते जलपरी वीज तेज कडाडते आकाशाच्या पटावरी…