Category: marathi kavya

  • अणू – ANOO

    तुझी वासना ठेव तुज जवळ तू निजी कामना भावना कवळ तू कराया निवाडा स्वतः साक्ष हो जुनी जीर्ण वस्त्रे पुरी सवळ तू न कोप करता शिकत जावे बरे उन्हाने तपव देह मथ खवळ तू कळाया तुला सर्व पर मोह तो उकळ मौन द्रव्ये तळा ढवळ तू गुरा वासरांना चरायास ने बसूनी दुपारी चऱ्हाट वळ तू…

  • राजकन्या – RAJ KANYA

    मुक्तक … प्रेमासाठी ती आसुसली ..एक राजकन्या प्रीतीच्या स्पर्शाने उठली …एक राजकन्या स्पर्शालाही महाग केले ..धर्म कसा वैरी माणुसकी जपणारी असली …एक राजकन्या मुक्तक… पाऊस जोगव्याचा सर जोगव्यात न्हाली शांतीत रंग भिजले सर लाडवात न्हाली हंडे भरून सांडे सुख कोवळ्या उन्हाचे ओतून धान्यराशी सर सांडव्यात न्हाली

  • अढळ सत्य – ADHAL SATYA

    मुक्तक… वाहून गेले डोळ्यामधून सारे खारे पाणी काळीज सांगे सुकले तपून खारे सारे पाणी गागा लगागा गागा लगालगा गा गागा गागा ओळख सुनेत्रा माझी लगावली झरणारे पाणी मुक्तक … थरथरे भूमी गव्हाळी रंगलेली गोठली थंडी सकाळी रंगलेली वाहने धावून थकली वळण येता धूळ त्यांवर पावसाळी रंगलेली चारोळी … सत्य युगाची अखेर हे तर वाक्य चुकीचे…

  • वेढणी – VEDHANI

    वळे वेढणी शुद्ध हेम मम पीळ अंतरी तुझी वारिया घुमत राहुदे शीळ अंतरी बिंब म्हणूकी भास धुक्याचा भाषेवरती हृदय जलावर फिकुटलेली नीळ अंतरी जरी कळीचा नारद कोणी कळ उघडाया कळा कलेच्या कुणास भावा खीळ अंतरी किती ग सुंदर शील तुझे हे झरझरणारे दृष्ट न लागो सबब तीट हा तीळ अंतरी जाण तीन रत्नांची महती खाण…

  • फ्यूज – FUSE

    पूर्ण कलायुत चंद्र धराया काक उडाले बाई हळदी कुंकू वाहुन स्वप्नी जागे झाले बाई ठार कराया मज शस्त्राने फरशी परजत आले मम कलमावर फक्त धडकता अंध जाहले बाई माझे जीवन रंगबिरंगी कृष्ण धवल पण त्यांचे बूच उघडता रंगकुपीचे फाल्गुन झाले बाई कर समझोता हिटर म्हणाला म्हणुन निकट मी गेले हाती घेता तप्त करा त्या फ्यूज…

  • थेअरी – THEARI

    झाड पाला पार होता पाळली शेळी आम्ही पान विकण्या शायरांना बसवले ठेली आम्ही थेअरी ना वाचली प्रात्यक्षिके केली आम्ही भावना घाण्यात गाळुन जाहलो तेली आम्ही ढेप होती आणलेली स्वस्त बाजारातूनी कवठ पिकले तोडुनीया बनवली जेली आम्ही गुरगुऱ्या वाघांस पकडुन कोंडुनी काऱ्यात सहज घोकुनी शेरास सव्वा झोपतो डेली आम्ही मूळ कारण काय ते ठाऊक त्यांना म्हणती…

  • अत्तर दर्दी – ATTAR DARDEE

    खळाळणारा बघत रसमयी धवल सांडवा भाळू कशाला तरल धुक्याच्या मलमलीतून रंग पारवा गाळू कशाला परवडणारी चैन सुगंधी दरवळणारी फुले वेलीवर शुभ्र कुंतली अत्तर दर्दी मूक ताटवा माळू कशाला जीव लावण्या जीवावरती कुत्रे मांजर पक्षी पारवे श्रावण बीवन पौष आषाढ पर्व भादवा पाळू कशाला पहाटवारा पहाट चुंबन टोक गाठता जाणीव नेणिव तोच तोच तो गूळ फोडुनी…