Category: marathi kavya

  • घटाटोप – GHATATOP(OVERCAST)

    घटाटोप … आभाळाच्या शिरी शोभतो घटाटोप जलदांचा पाऊस पाडाया धरणीवर खटाटोप जलदांचा डोंगरमाथ्यांवरती धोधो कोसळती जलधारा सत्य शिवाच्या सुंदरतेवर जटाटोप जलदांचा कृष्णमेघ… धरतीवर जणु कलश घड्यांचे कृष्णमेघ झरती भरुन वाहती जोहड धरणे कृष्णमेघ झरती चिंब जाहली भिजुन मृत्तिका निर्झर खळखळतो मधुर तराणे कृतज्ञतेचे कृष्णमेघ झरतो रुमाल… ज्येष्ठामधल्या नक्षत्रांची कमाल जादूई लक्ष लक्ष घन गर्द ढगांचा…

  • झाडे लावू – ZAADE LAAVU(PLANT TREES)

    दोन मुक्तके उखळ … उखळात धान कांडा म्हणतेय मुसळ बाई डोळ्यातले स्वतःच्या काढून कुसळ बाई मटकी मसूर चवळी भिजवून ठेव रात्री उकळून घ्या सकाळी करण्यास उसळ बाई झाडे लावू … उखाळ्या पाखाळ्या करण्यात वेळ वाया जाई कुटाळक्या चहाड्या करण्यात वेळ वाया जाई चला झाडे लावू पाऊस मेघ वर्षायाला मस्तीत टवाळ्या करण्यात वेळ वाया जाई  …

  • स्नान -SNAAN(BATHING)

    उन्हाच्या फुलांचे थवे स्नान करण्या इथे रोज येती उदक पान करण्या कुठे काय कैसे कशाला कुणाला असे प्रश्न का हे कनक दान करण्या मुक्या भावना तव नको कुस्करू रे बळी तेच देतील सोपान करण्या ढगांचा विजेचा नभी खेळ रंगे तुझे पावसा नित्य गुणगान करण्या प्रमाणात केले तरी कैक फाटे कळ्या पाकळ्यांना अधिक सान करण्या श्रुताची…

  • सोपान – SOPAN(BRIDGE)

    जिनालयाची वाटिका झाडे तरू वृक्ष वेली जिना चंदनी सोपान जाई जुई दक्ष वेली कुंभ कलश घडा हंडा भरूनी सांडते घागर जिनायतना तोलाया खांब साही तक्ष वेली रत्नत्रय चूल अग्नी चंदनाच्या बनी वारा जिनवाणी माय आई मोगऱ्याच्या अक्ष वेली यक्ष यक्षिणी देवता क्षेत्रपाल रक्षायाला जिनशासनाची सत्ता सिद्धचक्री वक्ष वेली जल गंध तांदूळ पुफ्फ दिव्व धुव्व चरू…

  • मुखडा – MUKHADA(FACE)

    शुभाशुभाची वर्दळ वावर न्याहाळू अंतरा शुद्ध भाव राहण्यास स्थावर प्रक्षाळू अंतरा मुखडा आणिक अंतऱ्यातला फरक जाणल्यावरी हलके हलके मिटेल अंतर सांभाळू अंतरा गझलेमधला रदीफ जैसा पुन्हा पुन्हा येतसे ऐसा जणू तो मुखडा वत्सल मायाळू अंतरा गझलियतीसह काफियातील अलामतीचा मणी चित्रांकित रत्नत्रय हृदयी गंधाळू अंतरा हिऱ्याप्रमाणे नाव झळकते सोन्याच्या कोंदणी पुरुषार्थाच्या दली उमलतो लाजाळू अंतरा

  • नीव – NEEV(BASE)

    परिणामस्वभावी जीव असे भाव जसा हृदयी परिणमताना शुभाशुभातुन तोच पसा हृदयी आर्जव मार्दव सत्य अहिंसा ब्रम्हचर्य कळसा शुद्धभावरुप क्षमा नीव मन सिद्ध वसा हृदयी

  • नवनगर – NAV NAGAR(NEW CITY)

    चित्र रेखिले चित्र बनविले बुद्धीपूर्वक भाव मनीचे सहज सहज मम त्यात प्रकटले .. मुनि हृदयीचे उदक शिंपडुन वेलीवरती मात्रा मोजत खुडता पाने हात प्रकटले….. श्रीगोंदा नवनगर जाहले यतिभंगाने यती कोपता आठवणींची अर्पुन ओंजळ .. जिनवाणीचा सार प्राशुनी रक्षायाला वृक्ष वाटिका मगरीचे दो दात प्रकटले …..