Category: marathi kavya

  • टॅटू – TATTOO

    बाई सुया घे गं दाभण घे …या जुन्या लोकगीताच्या चालीवर आधारित नवे गीत बाई सुया घे गं दाभण घे …. टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….(धृ. पद) कुरळ्या केसांच्या हौसाबाई डोकं धुवाया घ्या शिकेकाई दुखऱ्या फोडावर धोंडामाई लावा शेकुन बिब्बा बाई झाडाल वाडा मग बावन खणी … टिकल्या घ्या कुणी…

  • चिद्घनचपला – CHIDDGHAN CHAPALAA (THE FLASH OF ABSOLUTE AWARENESS)

    जाति : झपूर्झा हावभाव रे आवडले हास्य तापले सुंभ जळाले कातळकाया पाझरली पीळ सुटोनी कळ तुटली कातळातुनी वर आली भरून प्याला सांडू लागला काय जाहले सांग बरे निर्जरा ! कर्मनिर्जरा ! बाह्यरुपाला जे भुलले ते पाघळले ते काजळले शिकविण्यास त्या अंधांना घालित बसले कोड्याला खिळे ठोकुनी झाडाला ते झाड अडे कोड्यात पडे आग लाविता खाक…

  • गझल एक नाट्यगीत – GAZAL EK NATYAGEET (APPRECIATIVE REVIEW)

    कवी मनाला सौंदर्याचे वेड असते. म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचे, स्थळाचे, किंवा व्यक्तीचे बाह्यरुपच नाही तर त्यातील अंतरंगाच्या सौंदर्याचा शोध घेण्यासाठीही कवी मन धडपडत असते. निसर्गातले गूढरम्य चमत्कार, घटना यांचा तळागाळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी कवी, कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक स्वतःच्या पद्धतीने सतत प्रयत्न करत असतात. कवीच्या सुप्त मनाला सतत अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याची ओढ असते. सृष्टीतील गूढत्वाचे कवी…

  • सम्यक श्रद्धा -SAMYAK SHRADDHA ( RIGHT FAITH)

    सम्यक श्रद्धेवर मी जगते सृष्टी माझी जिवंत आहे जगावयाची जगवायाची माझी भाषा ज्वलंत आहे म्हणोत कोणी काही मजला लिहीत राहिन सुरेल गाणी गाण्यांमधल्या बकुळ फुलांचा परिमल कीर्ती दिगंत आहे उंच कड्याच्या टोकावरुनी निळ्या नभाला बांधिन झूला सभोवताली पहावयाला मला कुठे रे उसंत आहे दोन पावलांपुरती भूमी बघून रोवे पाय अता मी पंख पसरुनी झेप घ्यावया…

  • थरथर गात्री – THARTHAR GAATREE (shivering all over)

    पाऊस धो धो नऊ रात्री … घट भरता थरथर गात्री…. धारा झरती वेगे झरझर … स्वच्छ जाहले पदपथ परिसर काम तडीला पूर्णच नेले…. हळदी भाळी कुंकुम ठेले… उभा वृक्ष हा शरदात शमी …. नीलकमल फुल उमलले नमी … .. वर्तमान नव सृष्टी सुंदर …. दिव्य लाभता दृष्टी सुंदर ….. मयुर पंख कृष्ण जलद गगनी …..…

  • जिवंत वेडा – jivant veda (man living with supreme aim)

    तरही गझल गझलेची पहिली ओळ, कवी गंगाधर मुटे यांच्या “स्वदेशीचे ढोंगधतुरे” या कवितेची…. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल दुसरा कोणी रेलखाली तडफडून मेला काल जिवंत वेडा सुंदर जगला मस्तीत नाचत गात नातीगोती माया प्रीती झटकून मेला काल सदासर्वदा सिग्नल तोडे बाईकवरचा स्वार पुलाखालच्या हातगाडीस धडकून मेला काल पाऊस असा धो धो पडला रस्त्यावरती खड्डे…

  • घोडचुक – GHODCHUK (blunder)

    पेटुनीया मावशी पेटली मरिचीची ढग उशी पेटली मार्जात्याच्या घोडचुकीनें हॅरीची मावशी पेटली काढेपंडित मंत्र विसरता सणक मस्तकी कशी पेटली विषमय काढा कढईमधला ओतण्यास सांडशी पेटली पॉटर कुंभारास भेटण्या टणक कपाची बशी पेटली फुकनीने मी फुंक मारता एक चूल आळशी पेटली राख पेरता हलके हलके वाडग्यात लापशी पेटली गझल मात्रावृत्त (मात्रा १६)