Category: marathi kavya

  • फेसबूकी – FACEBOOKY (FAKE PROFILE FACEBOOK MEMBER)

    In this Ghazal, the poetess describes the behavior of some fake-profile facebook members. फेक खाते काढुनी ते फेसबूकी हिंडती मस्त शेरे भागिदारी भांडती अन तंटती लक्ष कंपू  बोल कट्टे  फेस तोंडा आणिती देखणे ते फेस बघुनी पण पुन्हा ते गंडती गा यमाचा गालगागा नारनाना राधिका कैक मात्रा कैक वृत्ते गझल वेडे धुंडती हीच माझी ती…

  • बावरी बाईक – BAAVAREE BIKE (CRAZY BIKE)

    बावरी बाईक उडता वात भरल्यासारखी सारखी धडके प्रिया तुज ब्रेक तुटल्यासारखी सागरी सूर्यास्त बघता पश्चिमेला केशरी भावना फेसाळते रे लाट फुटल्यासारखी मोकळा रस्ता तुझ्यास्तव थांबला आहे जरी तू अशी फिरतेस रमणी वाट चुकल्यासारखी ओळखीचे गाव आहे पाळखीची माणसे वावरे गावात पण ती नाव नसल्यासारखी कृष्णवसना पौर्णिमेची शुभ्रता मृदु प्राशिता चांदण्यांची बाग हसते चिंब भिजल्यासारखी चारुशीला…

  • गझल समीक्षा – GAZAL SAMIKSHAA (CRITIQUE OF A GHAZAL )

    . Ghazal samiksha means literary criticism of ghazal. गझल समीक्षा माझी सबला कविता माझ्या वत्सल अचला झळक झळकतिल मराठमोळ्या झकास फक्कड सुंदर गझला स्वच्छ नेटक्या देह मंदिरी मी काव्याचा सुगंध भरला धूर ओकतो मम मोबाइल शुभ्र अग्नी मी हाती धरला झ झबल्याचागं मला भावला नको ‘सुनेत्रा’ गज़ला गजला

  • सोयरे – SOYARE (RELATIONS BY MARRIAGE)

    In this Ghazal, kafiyaas are goodha, hooda, moodha, booda etc. (savatee kaafiyaa ghazal). जाणण्या आतूर आहे नेणिवेतिल गूढ कोणी अर्थ स्वप्नांचे बिलोरी लावतो मग हूड कोणी सागरी लाटेस अडवुन बेरकी भूखंड लाटे बांधतो घरकूल त्यावर गांजलेला मूढ कोणी मोडकी खुर्ची जरी ती पकडण्या धावून येतो ठोकुनी मोळ्या-खिळ्यांना टेकवीतो बूड कोणी सोयरे लुटतात म्हणुनी फेकण्या डोळ्यात…

  • सारे ऋतू तुझे – SAARE RUTOO TUZE (ALL YOUR SEASONS)

    This Ghazal is written in akashargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. Here kafiyaas are manaat, davaas, fulaas etc(Swaraanchaa kaafiyaa).Radif is ‘japale’. सारे ऋतू तुझे मी माझ्या मनात जपले अन पाकळ्या मिटोनी अधरी दवास जपले कित्येक पावसाळे नेत्रात गोठवूनी मी पापणीत माझ्या भिजल्या फुलास…

  • दिडकी- DIDAKEE (OLD SMALL COIN)

    In this Ghazal the poetess tells us about some critical problems in our society. राब राबुनी कुणास दिडकी दंडेलीने कुणास खिडकी कुणास धमकी कुणास धडकी घास अडकता कुणास उचकी कुंभाराचे गाढव म्हणते माझी माती माझी मडकी बळीस सांगुन करा निवाडा कुणास कापुस कुणास सरकी बोटावरती गरगर फिरता कुणास गिरकी कुणास फिरकी डोळ्यांभवती झोप भिरभिरे तरी…

  • माझा हंटर – MY HUNTER

    This Ghazal is written in 48 matras. Here radf is, ‘Asaa divaanaa maazaa hantar'(असा दिवाणा माझा हंटर) and kafiyas are paanyaamadhye, premaamadhye, rastyaamadhye etc. कडाडता जो, कुंपणवासी, उडी टाकतिल, पाण्यामध्ये, असा दिवाणा माझा हंटर! मायाचारी क्षुद्र कीट ही, पडतिल ज्याच्या, प्रेमामध्ये, असा दिवाणा माझा हंटर! ब्रम्हांडावर, टाकुन दृष्टी, पकडुन त्याला, माझ्या हाती, गरागरा मी, फिरवी…