-
चैतन्य विभोर – CHAITANYA VIBHOR
स्वभाव जाणून मम चैतन्य विभोर तुझ्या स्वभावात रम चैतन्य विभोर भाव विभोरता त्याग पुद्गलातली जाणुनी उत्तम खम चैतन्य विभोर परवशता पाशवी कधी न जाहली गळास लागता भ्रम चैतन्य विभोर झळाळते हृदय पुन्हा गळुन भावना मनातला खिरुन तम चैतन्य विभोर सजल सुनेत्रात जिनबिंबात पहात रोख श्वास घेत दम चैतन्य विभोर
-
खुशी – KHUSHI
कुठून येते खुशी मनाला नकळत माझ्या सूर ताल लय गझलियतेला उजळत माझ्या शुभ अशुभाच्या मिश्रणास पण ढवळत माझ्या फटके देते अशुभाला ती खवळत माझ्या निमताळी ना गझल गोमटी मनी माऊ ग सदैव बसते अवळ्यालाही सवळत माझ्या शुभ कर्मांसह वात्सल्याचे घर बांधे मी भरतीच्या गाजेवर गाजत उसळत माझ्या शब्द घनांतुन झरे लेखणी रत्नत्रय धन तेच निवडते…
-
रंगमाया – RANG MAYA
निळे सावळे नभ मळलेले क्षितिजावर हे झुकलेले धवल जांभळ्या रानफुलांच्या शिवारात मन फुललेले पीत पाकळ्या हरित पल्लवी चरण धरेवर जणू पडले रंगांच्या मायेत गुरफटले
-
धाडस – DHADAS
धाडस येते हळूहळू हळूहळू असत्य लागे दूर पळू हळूहळू कर्म निर्जरा सहज करू कळेल मग फक्त लागला देह मळू हळूहळू अता फटाके वाजवणे बंद करू लागो त्यांचे बूड जळू हळूहळू चपटी होता तळुन बिळुन पुरी बिरी वाळवून खोबरे तळू हळूहळू श्वान लागता पाठीशी घाबरुनी बावचळुन तो म्हणे वळू हळूहळू
-
बावखोल – BAVKHOL
बावधनी आड कैक दोषग्या बावखोल अर्थ ऐक दोषग्या खोल उतर आत शोध दोष तव बावडीत जन्म नैक दोषग्या नको अम्हा हाकु बिकू जा घरा बावळटां म्हणत हैक दोषग्या तुंग गिरी आकाशी पारवा बाव चीत भाव क्षैक दोषग्या वृक्षतळी बोरमणी कवडसे बावचळे स्वार बैक दोषग्या
-
उपचार – UPCHAR
कीड नडली पुन्हा बहर नडले कुठे पूर्ण उमलूनही पुष्प खुडले कुठे लाल अंगांग झाले रगडले कुठे चोर रंगेल हाती पकडले कुठे हा उन्हाळा नव्हे पावसाळा नव्हे नीर सांडे तरी भाव रडले कुठे मत्स्य भरतीतले रास जाळ्यामधे तप्त वाळूत मीन तडफडले कुठे कर्म प्राचीन जर धर्म संयम हवा कैक उपचार पण रोग झडले कुठे वीज नाचूनही…
-
राजधानी – RAJDHANI
पंकात वासनेच्या रुतले कधीच नाही कमळातले अली पण डसले कधीच नाही चढवून चिलखताला चिखलात खोल गेले तेथे निवास करणे रुचले कधीच नाही रंगून राजधानी सुकुमार भावनांची व्यापार त्यात करुनी फसले कधीच नाही घोटून अक्षरांना केली अशी करामत ठिणग्या करात फुलल्या विझले कधीच नाही तपवून पाप गेले देऊन पुण्य आले भिजले कृतज्ञ भावे रुसले कधीच नाही…