Category: marathi kavya

  • बंदूक – BANDOOK(GUN)

    हे केले मी ते केले मी मिरवायाचे कशास मी पण स्वभाव अपुला धर्म अहिंसा म्हणू कशाला दुजास मी पण लक्ष्यावरती लक्ष ठेवण्या सावध असणे आळस नाही आत्मधर्म लावण्या पणाला लावणार मी धसास मी पण खेळ न करते मी शब्दांचा अंकुर जपण्या शब्द पेरते फोडण्यास निःकाचित कर्मे कधी न घेते उशास मी पण व्यवहाराला चोख ठेवण्या…

  • टिनपाट – TIN PAAT(TIN CAN)

    वाट्यावर आलाय अहाहा ! जिनशासन आहे कोंढाणा कोंढवी रहावा जिनशासन आहे जपुन ठेवल्या सयी सईच्या कामाला आल्या जुनाट नोटा पडका वाडा जिनशासन आहे कोण हावरट कळेल आता शासन कोणाचे … आडगुडीतिल गुड्ड पडावा जिनशासन आहे भवन भुवनी स्थावर जंगम शेत रान बागा तोंडी जमता फेस गिळावा जिनशासन आहे ओळीमध्ये उभे राहिले पुतळे धातूंचे टिनपाट करी…

  • संगीत – SANGIT(MUSIC)

    बघ निळे आकाश त्यातिल मेघ हे स्वच्छ या पाण्यावरी नाव तरते मुग्ध बाला गुणगुणे धुन अक्षरी बिंब पाचू नीलकांती झुळझुळे गीत कुठले छेडुनी गात आहे सांग कुठली मधुर बोली बालिके ऐकलेले आठवेना बोल हे गा सुखाने मुक्त गाणे मोकळे ताल ठेका हात देती दोन हे द्यावया संगीत गझले छानसे

  • बळद – BALAD(UNDERGROUND ROOM)

    सारे जिनालयावर परतून जलद आले ओतावयास घागर घन कृष्ण सुखद आले सांगू कसे कुणाला जिनधर्म अर्थ महती जाणून तेच घेण्या क्षेत्रास वरद आले बघ शीत झुळुक आली भरण्या सुगंध देही आभाळ सावळे पण होऊन गडद आले आता कसे मिळावे त्या पारध्यास सावज फासे पटावरीचे ठोकून नरद आले ती फौज व्यंतरांची करण्या शिकार येता भूमीत गडप…

  • झेप – ZEP(A SUDDEN SPRING)

    जडलीय प्रीत माझी जिन शासनावरी या शांतीत चित्र भिजण्या गण शासनावरी या उलटेन डाव कपटी बांधावयास मुसक्या घनघोर युद्ध करण्या वन शासनावरी या जहरी कुटील नीती उखडावयास वेगे आलाय फौज फाटा घन शासनावरी या मी शूर लेकरांची आई स्मरून हृदयी प्राणा पणास लावे धन शासनावरी या आहेच मी ‘सुनेत्रा’ करण्यास सार्थ नावा अग्नीत झेप घेते…

  • बारावा – BARAVAA(TWELFTH)

    बघू कसा करतोस दहावा जिनशासन आहे मनात फुलला पीत बहावा जिनशासन आहे अंध रुढींना खाक कराया खडा पहारा हा बारावा तव करे सहावा जिनशासन आहे जिनबिंबावर अतूट श्रद्धा त्याला भय कसले तीर्थंकर अर्थात पहावा जिनशासन आहे तेराव्याची वाट पहावी भोंदू भक्तांनी वाट्यावर आलाय अहाहा जिनशासन आहे जिनानुयायी असे ‘सुनेत्रा’ मानस्तंभ जपण्या रत्नत्रय धारात नहावा जिनशासन…

  • तीर्थंकर – TIRTHANKAR(THE LORD)

    भूतकाळ मम अतिशय सुंदर वर्तमान पण सावध सुंदर पावसात भिजले तन मन वन चिंतनात मधु घट भर सुंदर फुल गुलाब लाल धवल फुलले हस्त कमल गुण जल धन सुंदर द्रव्य क्षेत्र मंगलमय वर्षा नाम स्थापना चंदन सुंदर सूर्य किरण कोवळे पान जणु पुनव चांदणे शशधर सुंदर मधुर पक्व फळ करात नाती सावधान शुभ ओंजळ सुंदर…