गझल .. .. … …. हाळी . . . . . ..
पाखरांचे बोल चाली
जीव काया रानमाळी
ये मनीमाऊ सकाळी
द्यावया दारात टाळी
रानवारा हूड भारी
वाह्तोया देत हाळी
गारव्याला सावलीला
बैसलीया माय काली
रातराणीला जपाया
कंटकांची वीण जाळी
दो कळ्यांसह उमलताना
वल्लरी अंधार गाळी
ऊस मैतर नारळाचा
पाहुनी तुज साद घाली
कोण सच्चा जाण आता
साधण्या कल्याण काळी
ऐक आत्म्याचे ‘सुनेत्रा’
पकडुनी लय सूर ताली