उकाडा उन्हाळी हंडी गव्हाळी
भरायास ओंब्या थंडी गव्हाळी
गुलाबात लाली धवल हळदुली
झगा पाकळ्यांचा गुंडी गव्हाळी
जिनांचा कराया प्रक्षाळ ज्येष्ठी
जलाची नभी कासंडी गव्हाळी
धडा काळ शिकवे वेळेप्रमाणे
पुन्हा प्रकटता पाखंडी गव्हाळी
गुणी अर्भकाची कुंची गुलाबी
तरल अभ्रकासम बंडी गव्हाळी
जसे पुत्र तैश्या कन्या करारी
कशी मुरगळीशी मुंडी गव्हाळी
उसाच्या फडावर नागीण कृष्णा
रसा शांतला नवचंडी गव्हाळी
निसर्गा हव्या ना बोन्साय ढोली
लिहायास तत्त्वे कुंडी गव्हाळी
उजागर अमरजा वेदी स्वयंभू
शिडीवर घडे उतरंडी गव्हाळी
तपूनी फुलावा ध्यानात अग्नी
जळायास कर्मे पिंडी गव्हाळी
करायास राशी रानी गव्हाच्या
निघाल्या हवेच्या झुंडी गव्हाळी
सजल घन बरसण्या गावी तडागी
उभ्या वाट अडवुन खिंडी गव्हाळी
खरी गोष्ट फळते सहजी सुनेत्रा
जरी ते पिकवती कंडी गव्हाळी