बटुव्याची खीर – BATUVYACHI KHEER


कणिक रव्याची घट्ट तिंबली
किसणीवरती किसून घेतली
पाटावरती उन्हात पसरून
कीस घेतला कडक वाळवून

कणकेचा मग फुलका लाटून
केला त्याचा बटुवा दुमडून
किसास भरुनी बटुव्यामध्ये
तोंड दुमडले त्या बटुव्याचे

फडताळे मग हळू उघडुनी
बटुव्याला त्या आत ठेवुनी
ख़ुशी ख़ुशी मन झाले हरिणी
डोलू लागली मनात तरुणी

येता संक्रांतीची भोगी
बटुव्याची त्या खीर बनवली
हाव हाव मग करून पुरती
भगुणे भरुनी खीर चापली

गळवट भरता जीव तरसला
हवा खायला आतुर झाला
हवेत चालून ढेकर दिधली
झोप सुखाची मजला आली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.