Category: Marathi sahitya

  • प्रक्षाळ – PRAKSHAAL

    चढ लेकी चढ चढ लेका चढ चढ आई चढ चढ बापा चढ करत शिखर सर वर झेंडा धर चढ भावा चढ प्रिय बाळा चढ …., भर घागर भर भर हंडा भर भर कळशी भर घट गडवा भर ताम्र कलश भर झर मेघा झर भर मडके भर पिप डेरा भर ….. झर निर्झरा झर खडकांमधून झर…

  • धनु – DHANU

    बघ नोट सावळी नाही मम ताव आगळा आत्म्या कार्माण वर्गणा रेखू जणु डाव आगळा आत्म्या गझलेत सामना करण्या झर शेर वेगळे रमणी तलवार रक्षिते जीवा मृदु घाव आगळा आत्म्या देऊळ चावडी शाळा वटवृक्ष पार राई गावांस गावपण आहे तव गाव आगळा आत्म्या नात्यात गोडवा जपण्या नक्षत्र टाळुनी बरसे वाटून पुण्य कर्मांचे घन भाव आगळा आत्म्या…

  • जल बाव -JAL BAAV

    ही नोट आगळी नाही मम ताव आगळा आत्म्या कार्माण वर्गणांचा जणु डाव आगळा आत्म्या गझलेत युद्ध हे कसले झर वेगळे रमणी तलवार रक्षिते जीवां मृदु घाव आगळा आत्म्या देऊळ चावडी शाळा वटवृक्ष पार अन शेते गावांस गाव पण आहे तव आगळा आत्म्या नात्यात गोडवा जपण्या नक्षत्र टाळुनी बरसे वाटून पुण्य कर्मांना घन भाव आगळा आत्म्या…

  • कोण कितीजण – KON KITEEJAN

    मुक्तक … कोण कोण पडत्यात कळले बाई कोण रडत्यात कळले बाई मी कश्याला रडावे सांगा कोण सडत्यात कळले बाई गझल .. कितीजण कोण पळाले कळले कळले कोण कसाई टळले कळले गा गा ल ल गा म्हणत राहता कोण बरे हळहळळे कळले रंगवलेल्या वाड्यामध्ये कोण कितीजण चळले कळले बात कशाला सांगू कसली कोण जुगारी ढळले कळले…

  • किल्ली – KILLEE

    हात असावे कुणीतरी ज्ञात असावे कुणीतरी विडा त्रयोदश गुणी खरा कात असावे कुणीतरी दिवा तेवण्या तेल झरे वात असावे कुणीतरी जरी आजचा शुभ दिन पण रात असावे कुणीतरी गुलाब किल्ली जपावया जात असावे कुणीतरी चिंब व्हावया शांत रसे न्हात असावे कुणीतरी सयी ‘सुनेत्रा’ मृदगंधी तात असावे कुणीतरी जपावया

  • उठाठेव – UTHATHEV

    फुकट नसावी उठाठेव ही विकत असावी उठाठेव ही आत्महिताला जपत उमटली मनी ठसावी उठाठेव ही अहं जयाने फुका पोसला त्यास लसावी उठाठेव ही तुझीच नांगी तुझी वासना तुला डसावी उठाठेव ही नागिण सळसळ करत लहरता गात हसावी उठाठेव ही जरी उतरली नशा नाचरी परत कसावी उठाठेव ही हृदय जलाच्या तळी मंदिरी शांत वसावी उठाठेव ही…

  • भावबंध – BHAV BANDH

    काकडारतीला दाटे .. बनी केतकी सुगंध रेशमाच्या धाग्यांसवे .. जुळावया भावबंध झरे पाऊस आषाढी .. जीव अजीवाचा बंध गाठणीला चार दाणे .. रुजावया मृदा गंध आस्त्रवाला पंचभूते .. शेत साळीचे डोलते संवराला निर्जरेला .. मोक्ष तत्त्व एकसंध झाला खरा आरंभ रे .. सत्य युगाचा न अंत भक्त पूर्ण जागा झाला .. तडकूनी न्याय अंध देह…