Category: Marathi sahitya

  • षण्मुख – SHANMUKH(SIX-FACED)

    पुरुषार्थाची ओळख ओळख ; निरहंकारी हसमुख ओळख . अंतर ज्याचे निर्मल निर्मळ ; बुद्धी त्याची तल्लख ओळख . दिवा तेवतो भाव उजळण्या ; तोच निरंजन अल्लख ओळख . . दहा दिशांचे वसन जयाचे ; देव दिगंबर षण्मुख ओळख . नऊ मोजण्या जिनायतन मम ; मीच सुनेत्रा पारख ओळख .

  • वेळ – VEL(TIMING)

    चोवीस तीर्थंकर गुरु ऐसे चोवीस ताशी घड्याळ जैसे दिवस स्वतःचा वेळ स्वतःची रात्री येण्या झोप सुखाची रत्नत्रय हृदयात स्थापना हा आत्म्याचा धर्म बाणा दशलक्षण पर्वात करावी पूजा उत्तम दहा गुणांची कल्पनेत इतुके न रमावे कि व्यवहाराचे हसू व्हावे निश्चय अंतरी ठाम असावा व्यवहाराने साधत जावा

  • स्वानुभव – SWANUBHAV(SELF EXPERIENCE)

    सत्य सांगुनी शांती मिळते. सत्य उघड कर सुयोग्य वेळी मिळण्या शांती. सत्य हेच स्वानुभव मोठा गुरु आपुला. सत्य असे जी स्तुती पोचते सहज अपुल्यापाशी. सत्य धर्म आर्जव आणि मार्दवात रे. सत्य जाणल्यावरती संयम खरा धर्म रे . सत्याला कळते लवकर हे लघु होण्यातच सुख आहे रे . सत्य जाणुनी ज्ञान वाढते अभिमानाला संपवते . सत्य…

  • शुद्ध भावे – SHUDDH BHAVE(WITH PURE MIND)

    विठू माऊलीचा लळा तुळशीची माळ गळा .. रखुमाई जाणतिया अंतरीच्या भक्ता कळा.. मन गुलाबी पाकळ्या गुलाबाचा गंध जळा… पाकळ्यांत भिजलेला पाकळ्यांत भिजलेला… . टपटप ओघळती थेंब काठी घळाघळा… एक एक मणीजसा स्फटिकाच्या माळेतला… पाकळीच्या काठावरी थेम्ब मणी गोळा झाला … चातुर्याने ठिबकला जलतरंगात आला… शुद्ध भावे वलयात जाई किनाऱ्यास गात … … .

  • लळा – LALHA (AFFECTION)

    विठू माऊलीचा लळा दाटुनिया येई गळा रखुमाई सांगतीया जाण गळवटी कळा बोल माणसा तू आता पुरे झाला कळवळा अन्यायाच्या तोंडापुढे फोड कोंडाळ्याच्या नळा उपेक्षित कलावंत गाठ त्यांच्या मन तळा किती अश्रू साठलेले वाहूदेत घळाघळा पदराने नका पुसू वाळूदेत झळझळा.

  • दंगा – DANGA( HUBBUB)

    जाग सख्या पांडुरंगा झुंजूमुंजू झालं सोनियाच्या रथातून सूर्यदेव आलं पूर्वदिशी केशरात जगन्नाथ न्हालं … चैतन्याच्या पावसात देऊळात धावा पंढरीचा विठुराया भेटायला यावा थवा पाखरांचा उडत वाळवंटी आला … प्रभातीच्या किरणात स्नानासाठी आला…. पंढरीची चंद्रभागा भीमा आधी नाव धुते पाखरांचे पंख पुसे गाव भाव दर्शनास माऊलीच्या रखुमाई आतुरली….. धूत पंख लेऊनीया मंदिरी पातली.. मंदिराच्या कळसाला सोन्याचा…

  • माझं घर – MAZA GHAR(MY HOME)

    माझं घर माझं घर घरासमोर डोंगर माझ्या घरात शांतीचा आहे कायम वावर आम्ही दोघे लेकासंगे सदा सुखात अपार लेकीप्रमाणेच लेक व्यवहारा चोख नेक सुवर्णाची रास नाणी माझं घर सोळा खणी माझं घर माझं घर माझ्या लेकीचं माहेर माझं घर माझं घर माझ्या नातीचं आजोळ जावयाच्या संगे येई नात आणि लेक बाई माझ्या घरात गोकुळ ज्ञानीयांची…