Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • भाऊबीज – FESTIVAL OF SISTER AND BROTHERS LOVE

    आभाळातिल सजल घनांची भाऊबीज ओवाळी जलदांस अंबरी ताई वीज धारारूपी गझलेचे उलगडण्या राज वाटिकेत फुलवून पिसारा मयुरा भीज जरी रिक्त जाहलेत बरसुन अक्षर मेघ भरुन पावती पण त्यागाचे होता चीज इंच इंच लढवाया डोंगर काव्यगंगे माय चंदनी खोड होउनी सोसू झीज स्वातंत्र्यातिल झोप सुखे घेण्यास भावा झऱ्याकाठच्या सारवलेल्या कुटीत नीज गझल मात्रावृत्त (२३ मात्रा)

    November 1, 2016
  • दीपावली – FESTIVAL OF LIGHTS

    दीपावली दीपावली दीपातळी दीपावली आली दिवे लावावया दीपा कळी दीपावली नामासवे नावेपरी दीपा जळी दीपावली गालावरी दोन्ही पडे दीपा खळी दीपावली चाफा फुले गाण्यातुनी दीपा दळी दीपावली सवती जरी हा काफिया दीपा फळी दीपावली सोन्यापरी आहे खरी दीपा सळी दीपावली

    November 1, 2016
  • सनई – CARINET

    भूचक्रासम गरगर चकली कढईमध्ये नाचत आहे शुभ्र करंजी चंद्रकलेसम पाटावरती हासत आहे रवा आणखी बेसन लाडू मोतिचुराच्या वड्या नि चिवडा तबकामध्ये भरून कन्या आनंदाने वाटत आहे शंकरपाळी खारी बुंदी अनारशांची नाजुक जाळी यांची गोडी माय दिवाळी चवीचवीने चाखत आहे सुतरफेणी बालुशाही नि बिनकाटेरी कडबोळ्यांनी डबे खचाखच भरून ताई वाट कुणाची पाहत आहे रांग दिव्यांची अंगणातली…

    October 26, 2016
  • मोक्ष लक्षुमी – Goddess of Suprime wealth

    दिवे अंगणी लावूया गीत दिव्यांचे गाऊया गाय वासरू इथे उभे त्यांना चारा घालूया धनत्रयोदशी ध्यानाची धने गूळ जल प्राशूया नरक चतुर्दशीस औक्षण करून श्रमणा वंदूया दीपावली जिन मंदिरी भल्या पहाटे पाहूया संध्यासमयी शुद्ध मनी मोक्ष लक्षुमी पुजूया फराळ वाटू प्रतिपदेस गप्पा टप्पा मारूया भाऊबीजेला प्रवास बसुन विमानी गाऊया अशी दिवाळी सौख्याची प्रेमामध्ये न्हावूया

    October 26, 2016
  • घनसर नाणी – SOLID COINS

    मधाळ प्रीती वचनामध्ये उतरू दे ग सुकलेले सुख जळणामध्ये उतरू दे ग बुडून जाता भरतीच्या या उचंबळात मधुरा भक्ती भजनामध्ये उतरू दे ग दे चटका डाळीस शिजवुनी जड कढईत रंग गुळाचा पुरणामध्ये उतरू दे ग जिरे मिरे वाटून फोडणी दे डाळीस स्वाद तयांचा वरणामध्ये उतरू दे ग रदीफ माझ्या गझलेमधले वादातीत पदे आरत्या कवनामध्ये उतरू…

    October 23, 2016
  • चांदणपंखी सही – Silver glow winged signature

    रम्य वनी चंद्रिका बैसली तळ्यात प्रतिबिंबी वाऱ्याने जल हलता थरथरली ती अंगांगी जललहरींनी काठ गाठला डुलत हलत जेव्हा गालावरती तिच्या उमटली खोल खळी तेव्हा अवचित झाली नभात गर्दी श्यामल मेघांची जळात नाचत सरी उतरल्या अंग धुण्यासाठी ढगाआडुनी शुभ्र चंद्रिका बिंब जळी शोधे जांभुळलेले वस्त्र तळ्यावर वरून ती फेके दिव्य प्रभेने झळाळणारे लेउन वस्त्र मही निळ्या…

    October 9, 2016
  • उडत्या ठिणग्या – flying embers

    लिहिले काही मुलाफुलांना कळेल ऐसे लिहिले सोपे माझ्यासंगे वळेल ऐसे पीडेलाही मुक्ती देण्या लेखणीतुनी लिहिले पीडा पूर्णपणे ती टळेल ऐसे कर्मनिर्जरा करण्यासाठी देह झिजविला लिहिले माझे पुण्य अता फळफळेल ऐसे धगधगणाऱ्या राखेमधुनी उडत्या ठिणग्या लिहिले अनवट ठिणग्यांनीही जळेल ऐसे हृदय जादुई कलम जादुई म्हणुन “सुनेत्रा” लिहिले मंतर भ्रम भय अवघे गळेल ऐसे गझल मात्रावृत्त (मात्रा…

    October 8, 2016
←Previous Page
1 … 122 123 124 125 126 … 289
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya