-
भीजपाऊस – BHEEJ PAAOOS (steady gentle rain, drizzle)
भीजपावसा अता भिजव मृत्तिका गावयास सावळी तलम मृत्तिका मृत्तिकेस बावऱ्या रंग लाव तू रंगल्यावरी घटास भरव मृत्तिका दाटल्या नभापरी वस्त्र जांभळे नेसवून घाटदार घडव मृत्तिका डौलदार चालते वीज प्राशुनी वाटते जणू सुरा सजल मृत्तिका गझल गात शिंपते चांदणे जळी वाहतेय सुंदरा तरल मृत्तिका गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – गालगालगालगा/गालगालगा/
-
चल चल पृथवे – CHAL CHAL PRUTHVE
चल चल वाऱ्या माझ्यासंगे वेळुबनातुन धावायाला शीळ घाल तू साद द्यावया … माझ्यातिल लपल्या गाण्याला…. चल चल पाण्या माझ्यासंगे झरा होउनी बागडण्याला खळखळ खळखळ मुक्त नाच तू… माझ्यामधली प्रीत नाचण्या चल चल बिजले माझ्यासंगे मेघांमधुनी कडाडण्याला चाबुक फिरवित कडाड वीजे … माझ्यामधुनी वीज फिराया…. चल चल आभाळा मजसंगे क्षितिजावरती झुकावयाला झुकता झुकता हळू चूंब तू…
-
स्वीकार – Acceptance
अक्षरातल्या कळ मंत्रांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या वारीच्या घाटात सुरांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या पुष्पपऱ्यांच्या हुंकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या अत्तरदर्दी व्यापारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मालवल्यावर समया साती देवघरातिल वेदीवरच्या खोल जलातिल अंधारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मंदिरातुनी निनादणारा मधुर नाद घंटेचा ऐकत णमोकारमय अक्षरातुनी कथा फुलांच्या उमटत गेल्या शशधर उगवे बीजेचा अन ओवाळाया…
-
ऋषभदेव – RUSHABH DEV
अयोग्य काही केले मी जर जाणवले मजला स्वीकारुन मी केले सुंदर जाणवले मजला काळ्या काळ्या नेत्री काजळ घालुन मी बघता चांदण भरले जळले अंबर जाणवले मजला वृषभ जयाचे लांच्छन तो तर ऋषभदेव शंभू आदिनाथ पहिला तीर्थंकर जाणवले मजला सत्यशोधनासाठी होता पंचम काळी पण महावीराचा आत्मसंगर जाणवले मजला दवबिंदूंची स्फटिकमण्यांसम करी माळ येता शंकर शंकर जपतो कंकर…
