Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • आतम समई – AATAM SAMAEE (soul’s lamp)

    घरात बसुनी ना काजळली आतम समई जीवासाठी मम मिणमिणली आतम समई क्षीण जाहली…. लहरीने वाऱ्याच्या अवखळ क्षणभर विझली पुन्हा उजळली आतम समई भूकंपाने घर कोसळता पुरात बुडता देवघरातिल तमात टिकली आतम समई सम्यक्त्त्वी ज्ञानाने घडली थरथरली पण मिथ्यात्त्वाने कधी न दिपली आतम समई वादळवारे सुनामीसही पुरून उरली चक्राला भेदून तेवली आतम समई गझल मात्रावृत्त (मात्रा…

    June 20, 2016
  • कागद – KAAGAD (paper)

    दशधर्माची शिडी चढोनी दहा पावले मोक्षासाठी उचल उचल माणसास प्राण्या उचल बाहुले मोक्षासाठी कठपुतळ्यांसम जीवन जगणे मम जीवाला ना मानवते चक्रव्युहासम क्लिष्ट सापळे कुणी बनविले मोक्षासाठी कुणी कुणाला पावत नसते फक्त पावती कर्मे अपुली देच पावती अथवा कागद जे जे जळले मोक्षासाठी तेलवात जळण्यासाठीही पात्र लागते हवा लागते मी देहाचे पात्र ताणले पण उजळवले मोक्षासाठी…

    June 20, 2016
  • जिनदेव – JIN DEV (God)

    जिनदेवांची वाट पाहते आत्मधर्मी राधा जिनदेवांची गोष्ट सांगते आत्मधर्मी राधा सत्य जाणण्या जन्मजन्मिचे दर्पण तोडुनीया जिनदेवांची भेट मागते आत्मधर्मी राधा काष्ठाच्या मंचकावरी घन पूजन करावयास जिनदेवांची मूर्त मांडते आत्मधर्मी राधा भल्या पहाटे शुद्ध घृताच्या दिव्यात तेजोमयी जिनदेवांची भक्त भासते आत्मधर्मी राधा जिनदेवाच्या भक्तीमध्ये चिंब चिंब न्हाउनी जिनदेवांची प्रीत वाचते आत्मधर्मी राधा गझल मात्रावृत्त (मात्रा २७)

    June 18, 2016
  • काष्ठसुंदरी – KAASHTH-SUNDAREE (“wooden beauty”)

    वेड लाविते वनदेवांना बाभुळलेली काष्ठसुंदरी झाडे लावी बांधावरती जांभुळलेली काष्ठसुंदरी लिहीत असते काहीबाही पेंगुळलेली काष्ठसुंदरी अर्थ काढते लाख तयातुन काजळलेली काष्ठसुंदरी गोड बोलते साखर पेरित डोईवरती मधुघट पेलित पावत असते पुरुषार्थीना गाभुळलेली काष्ठसुंदरी हाडाची ती काडे करुनी छप्पर घाली घरास अपुल्या घास भरविते बाल जिवांना पेकुळलेली काष्ठसुंदरी विहिरीवरचा रहाट ओढी झरझर सरसर डौलामध्ये सर्वांना पण…

    June 16, 2016
  • पाऊसगाणी – PAAOOS GAANEE

    आम्रतरुतळी बसून लिहुया पाऊसगाणी आंबे कैऱ्या बघून लिहुया पाऊसगाणी वनराईच्या तळ्यात डुंबू उडवीत पाणी धरणीवरती पडून लिहुया पाऊसगाणी वारा येता सुसाट धावत पडतील कैऱ्या खात मजेने रमून लिहुया पाऊसगाणी धो धो धो धो पडेल वेडा पाऊस नाचत धारांमध्ये भिजून लिहुया पाऊसगाणी बदके कमळे तळ्यात पोहत गातील गाणी त्यांच्यासंगे सजून लिहुया पाऊसगाणी गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २५)…

    June 16, 2016
  • याड – YAAD (madness)

    याड असूदे झाड असूदे जपू तयाला ताड असूदे माड असूदे जपू तयाला पोर असूदे अथवा प्राणी घे सांभाळुन गोड असूदे काड असूदे जपू तयाला मोहर येता आम्रतरुवर राखणीस जा कैरी अथवा पाड असूदे जपू तयाला वेल वाहते भार फुलांचा खोड तिचे मग नाजुक अथवा जाड असूदे जपू तयाला जल भरलेली निळ्यासावळ्या आठवणींची मोळी अथवा बाड…

    June 16, 2016
  • पानगळ – PAANGAL (leaf fall)

    मनात माझ्या दडले होते स्वप्न मला ते पडले होते जरी संकटे धावुन आली मनासारखे घडले होते स्वतः स्वतःवर केली प्रीती प्रेम स्वतःवर जडले होते पहात होते मी खिडकीतुन उंबऱ्यात ते अडले होते पानगळीचा ऋतू सुखाचा पान पान मम झडले होते जिवंत होती मैनाराणी पंख तिचे फडफडले होते सांग प्रियतमा सुंदर सुंदर रूप कुणाला नडले होते…

    June 16, 2016
←Previous Page
1 … 135 136 137 138 139 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya