Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • दर्दी – DARDEE

    वेताळ वाडी पाताळ माडी वेताळ वाडी आभाळ माडी सोन्यात भारी लेण्यास बांधू वेताळ वाडीचा काळ माडी बोलून होता मौनात सांडे वेताळ वाडी वाचाळ माडी तोंडास काळे फासून नाचे वेताळ वाडी नाठाळ माडी वेल्हाळ गोष्टी खोट्याच सांगे वेताळ वाडी पाल्हाळ माडी येण्यास सोटे बाहेर सारे वेताळ वाडीला जाळ माडी राखेतुनी घे आता भरारी वेताळ वाडीचा माळ…

    November 4, 2015
  • नाचले – NAACHALE

    जपण्यास मी काही फुले बहरात त्यांच्या नाचले ओलावण्या दाही दिशा मखरात त्यांच्या नाचले वाचाळता होती खरी जाणून तेव्हा थांबले मौनातल्या ओठांवरी अधरात त्यांच्या नाचले रानातल्या मातीत मी पेरून काही पाहिले होते जरी खेडे भले शहरात त्यांच्या नाचले माझेच होते काव्य ते पण का अशी भांबावले मुखपृष्ठ होते कैक पदरी कव्हरात त्यांच्या नाचले अवघड जरी वेळा…

    November 3, 2015
  • वेताळ – VETAAL

    आम्ही वेताळ वेताळ जोडू आकाश पाताळ पोसू नारळ बागांना करत काम नि धिंगाणा नारळ विकून बाजारी फेडू मागची उधारी मस्तीत दावत तेगार घालू पालथा बाजार पायपूसणी मोलाची खऱ्या प्रीतिच्या तोलाची बाजारी विकत घेउया डोंगरी झऱ्यात धुवूया कुटाळ कर्मे जाळूया धर्म दिगंबर पाळूया जंगल पाताळ बाजार समुद्र आकाश शेजार सुंदर शेजी शेजारी कटेल खोटा व्यापारी मात्रा-१४

    November 1, 2015
  • नकोशी – NAKOSHEE

    गळे उदासी नको नकोशी फुलून आली खरी असोशी जळात लाटा नभास भिडती विराट ओशन उडेल जोशी हटेल कचरा नकोनकोसा बनून हिरवी खुलेल मोशी हृदय नव्याने भरेल पुन्हा कळ्या फुलांसम फळास सोशी घडेल आता फुला हवे ते पुन्हा किडा तो रमेल कोशी अक्षर गण वृत्त – मात्रा- १६ लगावली-लगालगागा/लगालगागा/

    November 1, 2015
  • सावली – SAAVALEE

    खास मी आहेच इतुकी खास मी केले तुलाही सावली इतुकेच सुंदर भास मी केले तुलाही मी फुलांचा मंद परिमल रास तू रचिली जयांची उधळुनी ती वारियाने श्वास मी केले तुलाही पळभरीही ना ठरे तू माझिया मिसऱ्यात शेरी पण तरी जमवून क्षणक्षण तास मी केले तुलाही धबधब्याचे नीर जणु तू कोसळे वेगे फुसांडे पाच मम जुळवून…

    November 1, 2015
  • तीर्थंकर चोविसी – TEERTHANKAR CHOVISEE

    चल घे हाती सूप पाखडू मोत्यांसम जोंधळे चल ये जाळू धूप पाखडू मोत्यांसम जोंधळे हृदयामध्ये देव हासती तीर्थंकर चोविसी चल ते पाहू रूप पाखडू मोत्यांसम जोंधळे फुगडी झिम्मा खेळ अंगणी माझ्या बघ रंगले चल रे खेळू खूप पाखडू मोत्यांसम जोंधळे नभ मेघांनी कृष्ण जाहले धारा झरती निळ्या चल दे खोदू कूप पाखडू मोत्यांसम जोंधळे पलिता…

    October 29, 2015
  • निशा – NISHAA

    निळ्या पाखरांचा थवा गात आहे निळ्या आठवांचा थवा गात आहे खुल्या अंबरी चांदवा रंगलेला निळ्या राघवांचा थवा गात आहे टिपे गाळणारी निशा मौन होता निळ्या आसवांचा थवा गात आहे दिशातून दाही फुले शुभ्र पंखी निळ्या तारकांचा थवा गात आहे सुनेत्रातली काव्यधारा झराया निळ्या भावनांचा थवा गात आहे अक्षर गण वृत्त – मात्रा २० लगावली –…

    October 28, 2015
←Previous Page
1 … 149 150 151 152 153 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya