-
चित्रदर्शी – CHITRADARSHEE
किती द्यायचे मी तुझे सांग मजला अता फेडुदेरे पुरे पांग मजला नवे पंख भारी मला दो मिळाले तुझ्या दर्शनाला नको रांग मजला उसळते खिदळते गझल चित्रदर्शी तिचा पूर्ण प्याला जणू भांग मजला पुन्हा कुंडल्या या मुक्या मौन झाल्या दवाने लिहूदेत पंचांग मजला कुणी दूर गेले कुणी पार झाले गझल देतसे ना कधी टांग मजला खरा…
-
सपाता – SAPAATAA
जरी लाख सुंदर सख्यांच्या सपाता मला भावल्या या परांच्या सपाता निरागस मुलांच्या मनांना जपाया किती रंग ल्याल्या फुलांच्या सपाता निळ्या पाखरांसम उडाया नभी या अता घालुदे मज पऱ्यांच्या सपाता मृदुल पाउले ही गुलाबांप्रमाणे तयां रक्षिती या शरांच्या सपाता तुझे पाय दोन्ही जणू खांब दगडी तुला शोभती या खड्यांच्या सपाता कशाला हव्या तुज सुनेत्रा सपाता कधी…
-
खरी देवपूजा – KHAREE DEVPUJAA
जुन्या त्या घरांची स्मृती साद घाली खरी देवपूजा कृती साद घाली कुणा वासनांनी पुरे घेरलेले मला भावना प्रकृती साद घाली जरी ते हिशेबी तरी नवल घडले तयां साधना संस्कृती साद घाली मुक्या जाणिवांचा नवा अर्थ कळला अता नेणिवा जागृती साद घाली जरी तो अस्पर्शी निराकार आहे तुला मूर्त ती आकृती साद घाली वृत्त – भुजंगप्रयात,…
-
भरूदेत प्याला – BHAROODET PYAALAA
भरूदेत प्याला पुरा हा गझलचा सदा खळखळूदे झरा हा गझलचा पुन्हा मी लिहावे पुन्हा सांडवावे मला छंद जडला बरा हा गझलचा गझल प्रेमगीता गझल आत्मरूपी अता हात हाती धरा हा गझलचा नव्या दीपकांच्या उजळण्यास ज्योती मला साथ देई चिरा हा गझलचा जरी कैक वृत्ते सुबक नेटकी ही झगा त्यांस शोभे खरा हा गझलचा भुजंगाप्रमाणे सहज…
-
शांती – SHAANTEE
सांगूनही मी लाखदा तू ऐकले नाहीच रे आतातरी तू ऐकना लाभेल तुज शांतीच रे कोण कसे बोलायचे त्यांना तसे बोलूचदे याच्याविना घडणारना आता खरी क्रांतीच रे मी लेखणीला परजते शब्दांस या उजळावया आहे दुधारी धार हिजला लख्ख ही पातीच रे वागायचे ज्याला बरे वागेल तो तैसे भले सांभाळण्या घरकूल हे आता हवी बाईच रे रक्तातल्या…
-
कमानी – KAMAANEE
होते न काही बोलुनी पण बोलले तर पाहिजे जोडायला नाही कुणी पण जोडले तर पाहिजे माझे मला झाले पुरे आता पुरे करवादने जे ना बरे ते काम कोणी रोखले तर पाहिजे जगणे जरी काट्यावरी काट्यातली पाहू फुले पण झाड वठले बाभळीचे छाटले तर पाहिजे ते यायचे खदडायला अंदाज अमुचा घ्यायला आतातरी वाईट त्यांना वाटले तर…
-
पाऊस गाणी – PAAOOS GAANEE
ओढाळ पाणी धावते रानी फुले पाने झरे पाऊस गाणी गावया कोणी इथे आले बरे गोठ्यात धेनू अंगणी चाफा फुलांनी लगडला जात्यात दाणे सांडते पीठी तशी ओवी झरे आकाशगंगा सावळ्या मेघा म्हणे जा रे घना शेतात ज्वारी बाजरी डोले कणिस मोतीभरे उडतात पक्षी देखणे फांदीवरी घरटे झुले चाखावया मकरंद मध पुष्पांवरी फुलपाखरे बगिचे नवे झाले किती…