Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • लिहिते गझल जिथे मी – LIHITE GAZAL JITHE MEE

    लिहिते गझल जिथे मी वाजे नुपूर तेथे कोणीतरी लपोनी येते जरूर तेथे तव नाव झाकता मी हसतोच शेर गाली मग ओळ ओळ माझी लाजून चूर तेथे पाऊस लेखणीच्या डोळ्यांमधून झरता भिजवून चिंब गात्रे नाचे मयूर तेथे शब्दांस वाकवे मी मज शब्द नाचवीती कोणीच ना उरे मग हांजी हुजूर तेथे तू लाख टाळशी पण मक्त्यात मीच…

    November 13, 2014
  • भांडू नये कुणाशी – BHAANDOO NAYE KUNAASHEE

    भांडू नये कुणाशी कळते तरी न वळते भांडायला न कोणी तेव्हा स्वतःस पिळते सारेच गोडबोले कंटाळले पुरी मी भांडायला अताशा कोणी कसे न मिळते? स्पर्धाच घेउयाका भांडायची कुणाशी टिकणार मीच खमकी ना मी मधून पळते भांडायचे कशाला कोणी म्हणू नये रे त्याची मजा लुटे जो त्यालाच फक्त कळते मनसोक्त दाद देते कद्रूपणा न करते जो…

    November 13, 2014
  • माझ्यावरी फिदा ही – MAAZYAAVAREE FIDAA HEE

    माझ्यावरी फिदा ही माझी गझल दिवाणी ती तोलते मलाही आहे किती शहाणी मी पाझरे अताशा हलक्याच चाहुलीने हृदयात अमृताच्या आहेत कैक खाणी दचकून जाग आता मजला कधी न येते असते सदैव जागी माझ्यात एक राणी अफवाच पेरती ते त्यांचेच पीक घेती असली पिके विकाया लिहितात ते कहाणी माझी-तुझ्यातली ही प्रीतीच तारणारी गोष्टीतुनी खळाळे मम प्रेमरूप…

    November 13, 2014
  • श्रमण – SHRAMAN

    पूर्व प्रसिद्धी -मासिक महापुरुष, दीपावली विशेषांक, वर्ष ८वे, पुष्प १-२, ऑक्टोबर- नोव्हेंबर, २०१४ श्रमात रमती मनापासुनी जे जे त्यांना श्रमण म्हणावे, वीज बनविण्या साठविती जल म्हणून त्यांना धरण म्हणावे। वीज खेळवित तनामनातुन भावांचे नित मंथन करुनी, हृदयजली जिनबिंब पाहती त्यांना ब्राम्हण रमण म्हणावे। तीर्थंकर वाणीतिल कणकण टिपण्यासाठी धर्मसभा जी, बारा भागांमध्ये शोभीत तिजला समवशरण म्हणावे।…

    November 12, 2014
  • गगनाला चुंबुन आले – GAGANAALAA CHUMBUN AALE

    गगनाला चुंबुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये सीतेला भेटुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये तंबोरा लावित होती पण मजला पाहुन हसली तिजसंगे गाउन आले सोळाव्या स्वप्नामध्ये केशरी फुलांच्या बागा बागेत झुल्यावर हसऱ्या रामाला पाहुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये मंदिरी देव नी देवी अन हवेलीतले वारे त्या मरुता प्राशुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये जलदातुन शीतल सुरभित गंधोदक वर्षत होते पावसात नाचुन आले…

    November 12, 2014
  • तू सोन्याची पुतळी मृदुले – TOO SONYAACHEE PUTALEE MRUDULE

    तू सोन्याची पुतळी मृदुले कंठसाज वर गजरे झुकले अंगठीतले खडे दावती तव नयनांतिल बिंब चंचले तुझ्या अंगुली बोलत असता गोठ पाटल्या बिलवर भिजले दंडी वाक्या रुतून बसल्या गौर भाल बिन्दीने सजले कमर मेखला कनक कळ्यांची तुला वेढुनी बसली गझले फलंदाज तव धुरळा पाडे मोजुन धावा यंत्र मोडले त्रिफळा उडवत उसळत चेंडू परिघाच्या बाहेर सटकले रंगसंगती…

    November 12, 2014
  • ये भांडू आता थोडे – YE BHANDOO AATAA THODE

    ये भांडू आता थोडे गोडीने साखर वाढे कंटाळा आला मजला चल पाठ करूया पाढे घालून घाव चोचीने पिंजरा शृंखला तुटता फांदीवर पोपट झुलतो खावयास पेरू दाढे तू घाल जरासे पाणी भांड्याच्या आत तळाला करपेल विस्तवावरती मम क्षीरच निरसे गाढे परसातिल बागेमध्ये लावूत औषधी झाडे काढूया अर्क मुळांचा बनवाया अस्सल काढे दे काम अता तू त्याला…

    November 11, 2014
←Previous Page
1 … 181 182 183 184 185 … 292
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya