-
प्रेम दिवस – PREM DIVAS (day of love)
आज नाही लिहायची गझल नाही लिहायचं गीत लिहीन म्हणते काहीबाही साधंसुधं छंदगीत… आपला पहिला प्रेमदिवस खास खास नवथर लोभस… तीस वर्षापूर्वीचं ते मुग्ध मन कुठे रहायचो तेंव्हा आपण जणू मंतरलेलं चैत्रबन पुन्हा आठवतात तेच क्षण… कुठे काय हरवलं थोडं थोडं बदललं… अजून आपण त्याच नशेत धरणी अंबर आपल्याच कवेत जगतोय आपण खरे मजेत… दोन हुश्शार…
-
जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू – JIN PRIY BRAMHAA EESH KHUDAA TOO (you are god)
जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू हृदयी अमुच्या रहा सदा तू… नसे मागणे तुजला काही कार्य करू सरसावून बाही दिशा मोकळ्या आम्हा दाही नीर तेज नभ पवन मृदा तू … बदल घडावे घडण्यासाठी चैतन्याला जपण्यासाठी आनंदाने जगण्यासाठी नाविन्याची सजग अदा तू… दगडामधुनी खोदू लेणी शुभ्र फुलांची गुंफू वेणी पुरे जाहली देणीघेणी लढण्यासाठी उचल गदा तू……
-
माग – MAAG (to trace)
स्वप्न पाहिले होते तेंव्हा फक्त तुझेकी त्यांचेही या प्रश्नांचा माग काढण्या अजूनही बघ गाते मी भेटी अपुल्या त्या तेंव्हाच्या दर्पणातल्या प्रीतीच्या क्षण अनुभवण्या हुरहुरणारे मागे मागे जाते मी शांत तडागाच्या काठावर बसुन पाहता प्रतिबिम्बा बिंबामधली अनंत रूपे तुझीच बघुनी खुलते मी जे जे माझे ते सर्वांचे वेगवेगळे ना काही सुटता गुंता उजळुन जाते तुझे नि…
-
घटिका – GHATIKA (a clock,watch, or a traditional measure of time equal to 24 minutes)
अचूक कैश्या घटिका मोजू अंधुक धूसर कातरवेळी दिवा लाविता ज्योतीवरती पतंग जळती कातरवेळी बोलायाचे ऐकायाचे बरेच जे जे राहुन गेले आठवुनी तुज तेच बोलते तुला ऐकते कातरवेळी जिथे जिथे मी तुला भेटले नजरेमधले गूढ वाचले अश्या जळिस्थळी शांत तरुतळी फिरून येते कातरवेळी मौनामधले प्रश्न बोलके अधरावरती गोळा होता गाते भजने स्तोत्र आरत्या देवापुढती कातरवेळी हृदयावरती…
-
जाण – JAAN (understanding)
कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना खरेपणाची जाण दिसूदे भाव तोलताना स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी लढता लढता पडेल अथवा मरेल…
