-
सचैल काया – SACHAIL KAYA
Akasharganvrutta used in this Ghazal is LA GAA,LA GAA GAA, LA GAA, LA GAA GAA. Kafiyas used in this Ghazal are Bhijaya, Firaya, Dharaya etc. सुकून पुन्हा नको भिजाया उन्हात जारे अता फिराया जलात दिसता कुणी पुसटसे कशास जाते तया धराया फुलात आहे लपून कोणी अबोल प्रीतीसम भिजवाया तृषार्त हरिणी फसेल म्हणुनी मृगजळ लागे पहा…
-
बोल कंकणातले – BOL KANKANATALE
Akasharganvrutta used in this ghazal is GAA LA GAA LA, GAA LA GAA, GAA LA GAA LA, GAA LA GAA. ऐकते सख्या तुझे बोल कंकणातले पाहते सख्या तुझे बिंब आरशातले मी जरी मुकी मुकी ओठ घट्ट दाबुनी डोलतात कुंडले श्वास कुंडलातले कुरळ कुंतलांवरी भाळलास तू जरी मोजते पुन्हा पुन्हा वार काळजातले वाहतात नेत्र हे बोलतात…
-
अर्थ सांगू कसे मी कुणाला? – ARTHA SANGU KASE MEE KUNALA
This ghazal is written in Akasharganvrutta, GAA LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. In this Ghazal the poetess says, How can I explain My Ghazals? पावलांनी इथे का वळावे ? डोळियांनी असे का झुकावे? भेट झाली खरीना तरीही, गीत ओठी कशाने फुलावे! मी न माझी कुणीरे! कुणाची ? प्रश्न वेडे मला का पडावे…
-
कवच-कुंडले – KAVACH-KUNDALE
In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. this ghazal is written in 16 matras. क्षमा धर्म हा पाया उत्तम या झाडाची छाया उत्तम मार्दव माझे मम गझलेसम चिंब चिंब भिजवाया उत्तम आर्जव म्हणजे सरल-तरल मन मस्त मोगरे जाया उत्तम सत्य शिवाहुन सुंदर असते पुरते कळले राया उत्तम संयम म्हणजे जणू…
-
केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा – KEVAL ATMA SUDDHA SUNETRA
This Ghazal is written in Matravrutta(16 matras). In this Ghazal the poetess says, only our soul is pure. मिरवाया भाळावर टिकली गीते माझी तुजला दिधली वाट पाहुनी तुझी सख्यारे डोळ्यांमधली स्वप्ने निजली उभ्यानेच मी प्रवास केला माझी पहिली गाडी चुकली डोहाळे ना मज गोडाचे हवी हवीशी खमंग चकली केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा शुभ-अशुभाचे ही फळ नकली
-
जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा – WHEN YOU MET ME FIRST TIME
This poem is written in ‘Mukt-chhanda’ vrutta. Here the poetess describes first meeting with her beloved person. जेव्हा प्रथम भेटलास तेव्हा तूही होतास माझ्यासारखाच पाहिलंस एकदाच, आणि… नजर न मिळवताही मनात शिरलास आरपार नकळत छेडल्या तारा आणि- हृदयातून उमटला एक निशब्द सूर… अलगद शिरलास आत अगदी हृदयाच्या तळात वर आलास, चिंब चिंब भिजून टपटपणारे निळे…
-
धुवांधार जलधार – DHUVANDHAR JALDHAR
In this poem the poetess describes how heavily rain fell and then what happened. कोसळला तो वरुण नभातुन धुवांधार जलधार धरणीला ना पेलवला हा धारांचा जोहार थेंब तुझेरे मोतीमुक्ता नव्हते या वेळी उगवून येण्याआधी गेल्या शेतातिल साळी रडतील बागा रडतील शेते झरेल श्रावणधार रूप तुझे हे पाहुन सरिता पिसाट ही झाली कवेत घेउन गावे सारी…