सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • भाव ताजे – BHAV TAJE

    भाव ताजे रंग माझे प्रियच आहे जे न वाजे येच आता ऊन भाजे गा सख्या तू प्रेम गाजे घे उखाणा प्रीत लाजे मी ‘सुनेत्रा’ नीर पाजे वृत्त- गा ल गा गा

    June 8, 2012
  • राजसी – RAJASI

    हंस तू राजसी पण मला टाळिशी बोलणे ते तुझे गुंजते मानसी त्या जुन्या स्मृतित मी बहरते मस्तशी कामसू जग जरी मीच का आळशी डाव ना संपला हार का मानशी घे मला प्राशुनी घाव का मोजिशी वृत्त- गा ल गा, गा ल गा.

    June 8, 2012
  • चिंब मी – CHIMB MEE

    भिजून चिंब चिंब मी तरी नसे तुडुंब मी विशाल शून्य तू जरी निवांत एक टिंब मी झळाळशील बघ अता तुझेच शांत बिंब मी करेन शुद्ध ही हवा कडू वनात निंब मी जपेन गारवा इथे नव्हेच आग, बंब मी नकोच आडवे पडू कधी कधीच लंब मी वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.

    June 7, 2012
  • तू सांडतेस काही – TU SANDATES KAHI

    तू सांडतेस काही मग चाळतेस काही बोलायचे तसे ना पण बोलतेस काही श्वासातुनी मुक्याने मज सांगतेस काही जवळी असून सारे बघ शोधतेस काही जमवून चांदण्यांना ना माळतेस काही हा क्रम आणि मात्रा का गाळतेस काही ओझे न ही ‘सुनेत्रा’ तरि वाहतेस काही वृत्त- गा गा ल गा, ल गा गा.

    June 7, 2012
  • चहा – CHAHA

    नको अवेळी चहा सख्या वेळ जरा तू पहा सख्या नाते अपुले नको असे तीनावर जणु सहा सख्या या जगण्याची लज्जत घे वाफ होउनी वहा सख्या मी प्याला की नीर मधुर माझ्यातच तू रहा सख्या वाळ्याचे मी सरबत रे गंधामध्ये नहा  सख्या

    June 7, 2012
  • मोक्ष – MOKSHA

    This short-story is based on Jain philosophy. In this story it is told that where there is love there is a God. God lives in the heart of human beings. We can achieve moksha or Mukti On this earth. तारका- दिवाळी,२००३ कथासंग्रह-शासन सुमेरू प्रकाशन मी कुणी प्रतिभेचा स्पर्श लाभलेली कलावंत नाहीकी लेखिकाही नाही. तरीपण मी आज काहीतरी…

    June 6, 2012
  • PARODY POEM – पॅरोडी पोएम्स (विडंबन काव्य)

    Parody poem  is one of the popular and interesting types of poetry in Marathi literature. Acharya Atre, the well-known journalist, speaker, writer and poet showed his own special creativity in writing parody poems. He wrote many such poems that were based on Marathi poems written by great MARATHI POETS. He used the pen name Keshav…

    June 5, 2012
←Previous Page
1 … 269 270 271 272 273 … 281
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya