-
मळवट – MALAVAT
ही धरा म्हणाली काही अन अंबर हसले गाली सावळ्या मृत्तिकेवरती रोमांच जणू या साळी मज कळले नाही तेव्हा तुजलाही कळले नाही विश्वाची हिरवी भाषा बघ मळवट भरते भाळी
-
भाव ताजे – BHAV TAJE
भाव ताजे रंग माझे प्रियच आहे जे न वाजे येच आता ऊन भाजे गा सख्या तू प्रेम गाजे घे उखाणा प्रीत लाजे मी ‘सुनेत्रा’ नीर पाजे वृत्त- गा ल गा गा
-
राजसी – RAJASI
हंस तू राजसी पण मला टाळिशी बोलणे ते तुझे गुंजते मानसी त्या जुन्या स्मृतित मी बहरते मस्तशी कामसू जग जरी मीच का आळशी डाव ना संपला हार का मानशी घे मला प्राशुनी घाव का मोजिशी वृत्त- गा ल गा, गा ल गा.
-
चिंब मी – CHIMB MEE
भिजून चिंब चिंब मी तरी नसे तुडुंब मी विशाल शून्य तू जरी निवांत एक टिंब मी झळाळशील बघ अता तुझेच शांत बिंब मी करेन शुद्ध ही हवा कडू वनात निंब मी जपेन गारवा इथे नव्हेच आग, बंब मी नकोच आडवे पडू कधी कधीच लंब मी वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.
-
तू सांडतेस काही – TU SANDATES KAHI
तू सांडतेस काही मग चाळतेस काही बोलायचे तसे ना पण बोलतेस काही श्वासातुनी मुक्याने मज सांगतेस काही जवळी असून सारे बघ शोधतेस काही जमवून चांदण्यांना ना माळतेस काही हा क्रम आणि मात्रा का गाळतेस काही ओझे न ही ‘सुनेत्रा’ तरि वाहतेस काही वृत्त- गा गा ल गा, ल गा गा.
