-
विमाया – VIMAYA
कालिंदी काळिमा जलावर सोनेरी पश्चिमा जलावर अधांतरी ऋद्धिमा कौमुदी पूर्वरंग लालिमा जलावर नीर जांभ बैलांची माया कुठे गडद नीलिमा जलावर तृप्त घरधनी शांत केसरी ताम्रवर्ण रक्तिमा जलावर नभी दुपट्टा इंद्रधनुष्यी हरित कंच सिद्धिमा जलावर कुंकवातली तनु रोमांचित पीत प्रीत हळदिमा जलावर काय सुनेत्रा ओळख बाकी सत्वर उतरव विमा जलावर
-
कीड – KEED
साकार आत्मजेचा बांधा घटाव आहे लेण्यांत मूर्तिजेला घडण्यास वाव आहे सोंगे करून आपण दावू रुबाब त्यांना निर्लज्ज भेकडांचा भेकड ठराव आहे बळदांत साठवील्या धान्यास कीड भारी बुडता पुरात बळदे त्यांचा लिलाव आहे ते शिंपडून पाणी थाळी पुसून घेती आत्म्यात पाहण्याचा त्यांना सराव आहे आहेच मी सुनेत्रा दिलदार स्वाभिमानी जीवास जीव देणे माझा स्वभाव आहे
-
घझल – GHAZAL
तीन मुक्तके… घझल.. ग आणिक ज खाली नुक्ता हिंदी उर्दू ग़ज़ल पहाट झ झळझळता ग गुणगुणतो मराठमोळी गझल पहाट ल लवलवति पात जिव्हेची नाजुक कणखर सबला नार घ घरटे ग भूमीवर मम लेक नेक घझल पहाट कॉपी .. माझी भूमी काया माझी वाचा सुंदर माजी वाडी पाया आजी साचा सुंदर कॉफी कॉपी पोळी भाजी सोळा…
-
जंग – JANGA
भोवतीच्या रिंगणाला चालताना लंघ मित्रा तुज सदोदित रोखणारी वाहने कर भंग मित्रा घे भरारी ठोक भीती चुम्ब शिखरे पर्वतांची सोकलेले अंध मांत्रिक सोड त्यांचा संघ मित्रा कंच हिरवी लाल माती सप्तरंगी इंद्रधनुतिल लाव दुजाला स्वतःला भावती ते रंग मित्रा गाल गाल लगावलीची शेर बब्बर धीर सांगे गोष्ट मैत्रीची खरी पण चंट चालू तंग मित्रा धर्म…
-
भट्ट – BHATTA
जागा बागा नागा गागा गालल ललगा रागा गागा मी लगावली रचली आहे आ अलामत लगागा गागा राग रंग गा अक्षर कायम काफियांत मम पागा गागा दोन लघु गुरू इतुके ज्ञानी भट्ट करामत गागा गागा चित्र सुनेत्रा नवी हवेली मम चैतन्या फागा गागा
-
अधिक -ADHIK
वनदेवीच्या वनात जागा आपण पाहू वनदेवीच्या रणात बागा आपण पाहू भरले जे जे कषाय तू जे अंतर्यामी वनदेवीच्या तनात रागा आपण पाहू फुलाफुलांवर कळ्याकळ्यांवर रंग दुपारी पावसात पण सौरभ प्राशत दंग दुपारी रंगबिरंगी छत्रीमध्ये पाऊस धार अधिक श्रावणी चिंब चिंब मम अंग दुपारी मनपसंत या हवेत फिरुया गाऊ गाणे पाकोळ्यांसम मजेत उडुया गाऊ गाणे गझल…
-
पद्माग्नी – PADMAGNEE
जलद गतीने जलद बरसले जलधर गगनी गाली हसले कडाडताना वीज नभांगणि ढग घन लोभी का खेकसले मुसळ घुसळती पाऊस धार जणु कोसळते कंटक धसले जिनालयाच्या कलशामध्ये पद्माग्नीचे धन रसरसले गोकुळातल्या शिवरायाला अग्निहोत्री गो मूळ सले भलेभले जनवारी धारक काहुन पर दलदलीत फसले ओळख पाहू तूच सुनेत्रा कोण तरकले कोण तरसले