-
चंचल बाला – CHANCHAL BAALAA
हौदात जलावर धरता साय कधी पाहून सुखाने हसते माय कधी ती चंचल बाला बनुनी खळखळता पाऊस उतरतो धरण्या पाय कधी
-
रोजरोजचे – ROJ ROJACHE
कशास आता जाबसाल ते रोजरोजचे उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे
-
जगत – JAGAT
मी गुणगुणते जे गाणे आहे माझे माझ्यातुन उमले ते ते सारे माझे मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा
-
निर्मल – NIRMAL
मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव
-
दोर – DOR
बास वाटते लिहून जाहलेय बोर बोर काफिया पहा किती चकोर मोर चंद्रकोर कमलिनी दलात शांत पहुडलेत चांदण्यात भ्रमर भृंग हे नव्हेत नेत्र हे तुझे टपोर वाट पाहणे पुरे कुणास रोखले न मी परवडेल ना मला सदा तुझ्या जिवास घोर टोक गाठले असे पुढे न वाट कळस घाट घ्यायची अता उडीच कापलेत सर्व दोर काय चोरले…
-
लाटणे – LAATANE
लाटण्याने जरी लाटले पाहिजे लाटण्याने कधी ठोकले पाहिजे कंटका ज्या सवय टोचण्याची सदा कंटकालाच त्या टोचले पाहिजे जाहले मी स्मृती तरल वाफेपरी व्हावया गार पण गोठले पाहिजे लाटले श्रेय ना फुकट मी कोरडे श्रेय लाटावया भिजविले पाहिजे नाव पुद्गल असे जिंकते ना कधी तूच जीवा अता जिंकले पाहिजे
-
चीप -CHEEP
अजून केस मोकळे क्लीप पाठवून दे तिमिर पळुन जावया दीप पाठवून दे लिहू कसे अता तसे टोक मोडलेय रे लिहेन मी पुढे कधी नीप पाठवून दे झरत झरत भरत गात चालतेय लेखणी झरावया भराभरा जीप पाठवून दे भरावया हृदय घडे माठ घागरींसवे सुडौल घाटदारसे पीप पाठवून दे नकोत गोठ पाटल्या मिरवण्यास दो करी सुवर्ण कंकणे…