-
धन्य श्रेणिका – DHANY SHRENIKA (GRATEFUL)
धन्य श्रेणिका तुझी चेलना भावशुद्धिची देय प्रेरणा कोद्रूचा आहार दिल्यावर शृंखलेतुनी मुक्त चंदना त्रिशलानंदन सिद्धार्थाचा महावीर तीर्थंकर श्रमणा महावीर प्रभु मुनिसंघातिल प्रथम अर्जिका तिला वंदना ज्येष्ठेसह साध्वी भगिनींप्रति कृतज्ञतेची नित्य भावना घोर अंगिरस अरिष्टनेमी मुनी दिगंबर वायूरशना जिनधर्माची ध्वजा फडकुदे गिरनारावर हीच कामना
