-
कुंदन – KUNDAN
संधीचे करते सोने.. शब्दांतुन झरते सोने … भावांनी मन भरल्यावर .. अंगांगी भरते सोने … गगन गिरीवर इंद्रधनू .. रंगी थरथरते सोने … अक्षर कुंदन माळ गळा.. मजला सावरते सोने … जांभुळ पेरुंच्या राशी .. गोडीत बहरते सोने … कुदळी खुरपी चालवता .. खोरी खरखरते सोने … गझल सुनेत्रा फुलदाणी .. शेरात बहरते सोने …
-
औक्षण – AUKSHAN
जपावी प्रीत संसारी फुका भणभण वणवण नको नको ते दागिने शेती तुझी आंदण नको जिवाला जीव देते हीच मम ओवाळणी नको ते मेणबत्त्या फुंकणे औक्षण नको कशाला दोष तव शोधून टिपणे रोजचे तुझी तू चूक पकडावी फुका भांडण नको गळावा लोभ रागी नाटकी वृत्तीतला मनाने शांत व्हावे भटकणे वणवण नको सुनेत्रा नाव माझे ठेवते स्मरणात…
-
कीड – KEED
साकार आत्मजेचा बांधा घटाव आहे लेण्यांत मूर्तिजेला घडण्यास वाव आहे सोंगे करून आपण दावू रुबाब त्यांना निर्लज्ज भेकडांचा भेकड ठराव आहे बळदांत साठवील्या धान्यास कीड भारी बुडता पुरात बळदे त्यांचा लिलाव आहे ते शिंपडून पाणी थाळी पुसून घेती आत्म्यात पाहण्याचा त्यांना सराव आहे आहेच मी सुनेत्रा दिलदार स्वाभिमानी जीवास जीव देणे माझा स्वभाव आहे
-
जंग – JANGA
भोवतीच्या रिंगणाला चालताना लंघ मित्रा तुज सदोदित रोखणारी वाहने कर भंग मित्रा घे भरारी ठोक भीती चुम्ब शिखरे पर्वतांची सोकलेले अंध मांत्रिक सोड त्यांचा संघ मित्रा कंच हिरवी लाल माती सप्तरंगी इंद्रधनुतिल लाव दुजाला स्वतःला भावती ते रंग मित्रा गाल गाल लगावलीची शेर बब्बर धीर सांगे गोष्ट मैत्रीची खरी पण चंट चालू तंग मित्रा धर्म…
-
भट्ट – BHATTA
जागा बागा नागा गागा गालल ललगा रागा गागा मी लगावली रचली आहे आ अलामत लगागा गागा राग रंग गा अक्षर कायम काफियांत मम पागा गागा दोन लघु गुरू इतुके ज्ञानी भट्ट करामत गागा गागा चित्र सुनेत्रा नवी हवेली मम चैतन्या फागा गागा
-
खलास – KHALAAS
खलास … मुक्तक खलास करते रण अतिरेकी डोके एखादे खलात कुटते चिकणि सुपारी डोके एखादे गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे अलबेली … मुक्तक जशी टोकरी हवी हवेली हवी तशीच मैत्री मज अलबेली हवी कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस अशीच छत्री कवीस वेली हवी
-
खरेदी – KHAREDEE
असा मी असामी न कासव ससा मी कराया खरेदी उघडला कसा मी जपायास जीवा हिताचा वसा मी उठवते वहीवर मनाचा ठसा मी मनाला सुनेत्रा धुते खसखसा मी