Tag: Ghazal in akshargan vrutta

  • तुडुंब – TUDUMB

    गाता भजन स्तवन उमटे हृदयात बिंब भावाचे गाता नवी गझल भिजले प्रतिबिंब चिंब भावाचे भरुनी नयन टपटप खिरत टिंबात लिंब सळसळता गाता सरोवरी हलले पाणी तुडुंब भावाचे लगावली – गागा/लगा/लगा/गागा/गागाल/गाल/गागागा/ मात्रा – १४/१४/ अक्षरगण वृत्त

  • दवा जादुई – DAVAA JADUI

    मीठ नि मिरची हिंग मोहरी नजरउतरवे भरभर मी तप्त निखारे दृष्ट काढुनी तिथे फेकते झरझर मी अंतर मिटण्या अंतरातले जपू कोणता मंतर मी प्रश्न मिटे पण शब्द वितळती भरे अक्षरी कर्पुर मी ..हुस्ने मतला १ जिनवाणीतिल भाव जोडुनी जिना बांधते मंदिर मी किणकिणणारे वात लहरता कधी त्यातले झुंबर मी … हुस्ने मतला २ वृत्त जपूकी…

  • शांत रस – SHAANT RAS

    मौन ते बोलते जे सले टाळते भावना प्रकटते जादुई गाव ते गझल दल उमलते वाजती चाळ ते चांदणे गाळते रंगले वर्ण ते काफिया माळते गाल गा गाजते शांत रस पाजते

  • दीप दीप – DEEP DEEP

    दीप दीप लक्ष दीप तेवतात शांत दीप चंद्र शुक्र गगन दीप देह चैत्य आत्म दीप अंतरात लाव दीप गझल वात भाव दीप मम सुनेत्र दोन दीप  

  • खाक्या – KHAKYAA

    मौन काव्या कळे सख्य माझे तुझे मौन अधरी भले सख्य माझे तुझे नित्य सौख्यात मी रोज तैसाच तू मौन उघडे दळे सख्य माझे तुझे दावता पोलिसी कडक खाक्या तुझा मौन किंचित हले सख्य माझे तुझे मस्त माझ्यात मी मूक होते सखे मौन सखये तळे सख्य माझे तुझे शोध कोठे सखी गुप्त झाल्या सख्या मौन मुक्ताफळे…

  • सूळ SOOL

    डोळ्यात धूळ गेली ढवळून मूळ गेली धुंडून कोपऱ्यांना पाहून कूळ गेली डोक्यात स्वच्छतेचे घेऊन खूळ गेली उतरून मस्तकी मम उठवून शूळ गेली झालीच गझल भारी घालून रूळ गेली रक्ता चटावलेला मोडून सूळ गेली तोंडात साठलेली टाकून चूळ गेली

  • गुरुकृपा – GURU KRUPAA

    गा उन्हाचे रंग उधळत मस्तपैकी गा धरेला मस्त खुलवत मस्तपैकी नित्य असतो पंचमी सण फाल्गुनी बघ राग रुसवा सोड पळवत मस्तपैकी लाल पिवळा जांभळा घन गगन चुंबे नाच चपले धुंद चमकत मस्तपैकी काय बरवे काय सुखवे ओळखूनी बरस मेघा देह भिजवत मस्तपैकी मोतियांसम शब्द बरसे गझल वेडी गा ढगा रे ढोल बडवत मस्त पैकी तू…