Tag: Ghazal in akshargan vrutta

  • शड्डू – SHADDOO

    वाजता झुलता कटीचा कनक छल्ला वाटतो ना दूरचा कुठलाच पल्ला पापण्या ओढून घेता लोचनांवर आसवांचा साठलेला फोड गल्ला माय राती जोजवीता तान्हुल्याला गुंफ अंगाईत लोरी शब्द लल्ला मांजरे मिचकावता डोळे मिटूनी गझलच्या भाषेत द्यावा काय सल्ला आंधळ्या कोशिंबिरीच्या सोड खेळा ठोकुनी शड्डू फडी तू उतर मल्ला पूर्व पुण्याईच संधी देतसे बघ मारण्या लोण्यावरी बोक्यास डल्ला…

  • दिडदा दिडदा – DIDADA DIDADA

    झुळझुळणारी भरारणारी लहरत झिंगत गुणगुणणारी हवा हवी मज श्वास घ्यायला प्राणवायूयुत पानांमधुनी सळसळणारी हवा हवी मज भूमीवर हिरवाई राने फळाफुलांच्या फुलण्या बागा सृष्टीमाते जलदांचा रथ मुक्त धावण्या बिजलीसंगे कडाडणारी हवा हवी मज जीवात्म्यांची मौनी भाषा टिपण्यासाठी खिरण्यासाठी सर्वांगातुन डोंगरमाथे प्रपात चुंबित झऱ्यासंगती खळाळणारी हवा हवी मज काव्यकुपीतिल अत्तर माझे अक्षर पुद्गल चिंब भिजवुनी टपटपताना लिली…

  • प्रतोद – PRATOD

    रथावरी सारथी करी मी कडाड उडवित प्रतोद आहे सुटावया छिडकत्या जिवांना गती जयांची निगोद आहे मला न भावे हसुन हसविण्या कुटील रोगी टवाळ वृत्ती लयीत येता भाव पकडतो सहज निखळ मम विनोद आहे फुकाच भाषा अता तहाची टळून गेली जुनाट घटिका नवीन स्वप्ने पुरी कराया भरारणारा प्रमोद आहे कशास तारा उगाच छेडू घनी विजेच्या अश्या…

  • घास – GHAAS

    वृत्तीत मातृकेचे गाणे नवे वळेल लालूच मोहवेना मनमोर का चळेल आत्म्यात देव अपुल्या त्याच्यापुढे झुकून समजाव तू स्वतःला तेव्हाच नय कळेल सुम्भात पीळ आहे प्राचीन कर्म मूळ तो पीळ सहज सुटता तव पुण्य फळफळेल पंचांग पाहशी तू मिळवावयास पीठ जात्यात घास नाही मग काय ते दळेल सद्धर्म दर्शनाचे जेंव्हा रुजेल बीज हृदयात अंकुराची चाहूल सळसळेल

  • पूर्वभव – PURVABHAV

    थबकुनी अंदाज घेतो शेर माझा आगळ्या डौलात येतो शेर माझा भावनांचे मेघ तपुनी थंड होता अंतरी चाहूल देतो शेर माझा पाहता मुनीराज ध्यानी मौन विपिनी बैसतो त्यांच्यापुढे तो शेर माझा कैकवेळा खोडुनी मी परत लिहिता पूर्वभव कुठला स्मरे तो शेर माझा जाग येता मज पहाटे शांत समयी शिखरजी यात्रेस नेतो शेर माझा

  • अत्तर घन – ATTAR GHAN

    अधर सहज मिटलेले रेषेवर जुळलेले आघात न कसलाही प्रतिघातच उठलेले पर्णांचे शुष्क थवे वाऱ्यावर उडलेले पानातुन तांबुस दो मौन तुझे हसलेले स्वप्नातच स्वप्न जणू नवल खरे घडलेले क्षितिजावर सांज उभी अत्तर घन झरलेले गा गा गा गुणगुणता उत्तर मज सुचलेले जगण्याची आस नशा जीव जगी रमलेले नीर सुनेत्रात पुन्हा पापण दल हललेले

  • आत्मजा -AATMAJAA

    मोरपंखी कुंचला दहिवराने चिंबला कल्पना माझ्या खऱ्या तरल कोमल श्रुंखला गीत कविता गझल धन जीव माझा दंगला साखळी सहजी तुटे मोद भूवर सांडला जपत आले सर्वदा भाव हळवा दंगला पंचभूते नाचता काळ नाही भंगला मी सुनेत्रा आत्मजा देहरूपी बंगला