Tag: Ghazal in akshargan vrutta

  • तीस – TEES

    प्रथम तू झोड तीस पेल कलम प्रथम तू ठोक तीस झेल कलम फुलवुनी मिथ्य ती खुळी मशाल प्रथम तू रोख ती सलेल कलम धर पुरी काजळी तुझ्या घरात प्रथम तू मोज तीस तेलकलम गझल जी दौडते अशी भरात प्रथम तू जोड ती सजेल कलम चल खरी भांग खास झोकण्यास प्रथम तू घोट तीस बेल कलम…

  • ब्रह्मांड अवघे – BRAMHAAND AVAGHE

    जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते दिव्या ऐसा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी…

  • स्वरदा – SWARADAA

    सत्य प्रिय मी मला प्रिय मी सत्य प्रिय मी झुला प्रिय मी कृष्ण घन लेखणीत झरे सत्य प्रिय मी कला प्रिय मी शब्द शर लक्ष्यभेद करी सत्य प्रिय मी बला प्रिय मी न्याय कर आंधळ्या बरवा सत्य प्रिय मी तुला प्रिय मी सांग तिज ऐकण्या गझला सत्य प्रिय मी जिला प्रिय मी झाड मज बोलले…

  • ध्यानअग्नी – DHYAAN AGANEE

    नेणिवेतिल सुप्त इच्छा जाणुनी ये जे तुला मिळवायचे ते पाहुनी ये अंतरातिल गूढ निर्झर नित्य वाहे भावघन सामर्थ्य मिळण्या प्राशुनी ये घे प्रवाहाच्या दिशेने लहर आतिल आतल्या हाकेस सुमधुर ऐकुनी ये मी कधीही रुग्ण नव्हते सजग होते हे लढाऊ आर्जवाशी बोलुनी ये मी क्षमाशिल संयमाने क्रोध त्यागे मार्दवाशी मैत्र होण्या तापुनी ये देहकाष्ठा वाळलेल्या शिस्त…

  • आड – AAD

    बाळगणेशा रूप साजिरे बाळगणेशा खूप साजिरे विघ्नविनाशक श्रावणी सरी बाळगणेशा धूप साजिरे कढवुन लोणी शुभ्र मिळविले बाळगणेशा तूप साजिरे जोहड विहिरी आड देखणे बाळगणेशा कूप साजिरे पाखडण्या धान्यास आणिले बाळगणेशा सूप साजिरे गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६) लगावली – गाललगागा/गालगालगा/

  • मला आवडे ग – MALAA AAVADE G

    मला आवडे ग लिहायास काही तिला आवडे ग जपायास काही कुणी आवडेल तिलाही दिवाना फुला आवडे ग पहायास काही रुमालावरी न रुमालात पक्षी भला आवडे ग भरायास काही नको ते रितेपण वाट्यास तिचिया जिला आवडे ग विणायास काही धुंवाधार श्रावण आषाढ झिमझिम जला आवडे ग धरायास काही गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – लगागा/लगाल/लगागा/लगागा/

  • पुण्यनगरी – PUNYA-NAGAREE

    सावळा पाऊस ल्याली पुण्यनगरी श्रावणी धारांत न्हाली पुण्यनगरी मावळ्यांची संस्कृती इतिहास पावन आठवोनी चिंब झाली पुण्यनगरी लेखणीचे रक्षिण्या स्वातंत्र्य लढते रेखुनीया तिलक भाली पुण्यनगरी टिकवुनी बाणा मराठी इंग्रजीसम वाघिणीचे दूध प्याली पुण्यनगरी उगवतीच्या लालिम्याला प्राशुनीया दिव्य शोभे वीरकाली पुण्यनगरी गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २४) लगावली – गालगागा/ ३ वेळा