Tag: Ghazal in akshargan vrutta

  • ती अर्धवेडी – TEE ARDH-VEDI

    बावरीकी बावळी ही माझिया जाळ्यात रे माजलेली काष्ठ काठी माझिया जाळ्यात रे दाविते मजला हुशारी समजते मज काय ती? काव्य कच्चे चाखणारी माझिया जाळ्यात रे मूर्ख भोंदू माणसांना नाचवे तालावरी नाटकी ती अर्धवेडी माझिया जाळ्यात रे जो अहं कुरवाळते ती तो अहं जाळी तिला धामिणीसम वीषधारी माझिया जाळ्यात रे मी पणा हा ना अहंपण हा…

  • सुमार भाव – SUMAR BHAV

    मधुर फळे अती कडू तुझ्यामुळेच जाहली बिया जरी न जून त्या मुळे खिळेच जाहली सुरुंग लावुनी भुईत ध्वस्त टेकडी दिसे इमारती नव्या उभ्या तळी बिळेच जाहली उन्हात वावरे फिरे थकून जाय रोज ती वहायचे खळाळुनी तरी तळेच जाहली नयन निळे नजर खुळी पडून पाकळ्यांवरी फुलांवरील अष्टगंध अन टिळेच जाहली सुमार भावसंपदा तरी म्हणे परीच मी…

  • शेणकूट – SheNakooT

    धान्यधून्य अंगणात पारव्यास घाल भूक लागलीय त्यास जेवण्यास घाल कुजट मिट्ट लाकडास ऊन देच आज लागलीय ओल त्यास वाळण्यास घाल शेणकूट घे वरून घासलेट ओत चूल पेटवून त्यात ओंडक्यास घाल तेल कडक तापवून उडव मोहरीस फोडणीत स्वच्छ धुवुन माळव्यास घाल फोड फोड हालवून वाफवून छान तिखट मीठ वरुन त्यात मुरवण्यास घाल गझल-अक्षरगण वृत्त,मात्रा २१ लगावली-गालगाल/गालगाल/गालगालगाल/

  • पाऊस वेड लावी – PAAOOS VED LAAVEE

    कोषातल्या कळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी मौनातल्या गळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी गळतात छप्परे भिंतीस पोपडे पण सुविचार मांडणाऱ्या शाळेतल्या फळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी घेऊन कागदांचे गलबत जहाज होड्या येतात बालके मग ओढे झरे तळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी भेगाळल्या धरेला मातीस तापलेल्या शिम्पावया फुलांनी बागा…

  • ऐकेन आज काही – AIKEN AAJ KAAHEE

    ऐकेन आज काही पण बोलणार नाही शब्दांस काव्य भरल्या मी छाटणार नाही सांगून टाक हृदयी कुठले रहस्य दडले ऐन्यात त्यास लपुनी मी पाहणार नाही जाई जुई चमेली चाफा नि मोगऱ्याला टोचूनिया सुईने मी गुंफणार नाही झाकून नेत्र दोन्ही ऐकेन देहबोली डोळ्यात भावनांना मी शोधणार नाही आताच पावसाचे मज बंद पत्र आले उघडून त्यास सुद्धा मी…

  • मेघदूत MEGH DOOT

    मेघदूत श्याम श्वेत मूक मूक लोचनात गर्द दाट रान शेत मूक मूक लोचनात माय ओणवी जलास शिम्पतेय अंगणात कृष्णरंग पेरलेत मूक मूक लोचनात सान बालिका खुडे फुले मनात गात गात मुग्ध भावना सचेत मूक मूक लोचनात पौर्णिमेस नाचतेय लाट लाट सागरात शंख शिंपले नि रेत मूक मूक लोचनात ही हवा ढगाळ कुंद दावतेय आरशास कैक…

  • मुक्त हस्त चित्र – MUKT HAST CHITR

    मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून…