-
जिनध्वजा – (victory banner of JIN)
-
चुंबक – CHUMBAK (magnet)
जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते भावनांचा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी ही…
-
स्वरदा – SWARADA (one who is associated with a nice vocal melody)
-
ध्यानअग्नी – DHYAAN AGANEE (flame of meditation)
नेणिवेतिल सुप्त इच्छा जाणुनी ये जे तुला मिळवायचे ते पाहुनी ये अंतरातिल गूढ निर्झर नित्य वाहे भावघन सामर्थ्य मिळण्या प्राशुनी ये घे प्रवाहाच्या दिशेने लहर आतिल आतल्या हाकेस सुमधुर ऐकुनी ये मी कधीही रुग्ण नव्हते सजग होते हे लढाऊ आर्जवाशी बोलुनी ये मी क्षमाशिल संयमाने क्रोध त्यागे मार्दवाशी मैत्र होण्या तापुनी ये देहकाष्ठा वाळलेल्या शिस्त…
-
आड – AAD (well)
-
मला आवडे – MALA AVADE (I LIKE )
मला आवडे ग लिहायास काही तिला आवडे ग जपायास काही कुणी आवडेल तिलाही दिवाना फुला आवडे ग पहायास काही रुमालावरी न रुमालात पक्षी भला आवडे ग भरायास काही नको ते रितेपण वाट्यास तिचिया जिला आवडे ग विणायास काही धुंवाधार श्रावण आषाढ झिमझिम जला आवडे ग धरायास काही गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – लगागा/लगाल/लगागा/लगागा/
-
पुण्यनगरी – PUNYA-NAGAREE
सावळा पाऊस ल्याली पुण्यनगरी श्रावणी धारांत न्हाली पुण्यनगरी मावळ्यांची संस्कृती इतिहास पावन आठवोनी चिंब झाली पुण्यनगरी लेखणीचे रक्षिण्या स्वातंत्र्य लढते रेखुनीया तिलक भाली पुण्यनगरी टिकवुनी बाणा मराठी इंग्रजीसम वाघिणीचे दूध प्याली पुण्यनगरी उगवतीच्या लालिम्याला प्राशुनीया दिव्य शोभे वीरकाली पुण्यनगरी गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २४) लगावली – गालगागा/ ३ वेळा