-
नेणिवेची चारुता – NENIVECHEE CHAARUTAA
जाणिवेची जागृती मम नेणिवेची चारुता मजजवळ सौंदर्यदृष्टी आत्मियाची शुद्धता गातसे सौंदर्य माझे वाहते गात्रातुनी मी फिदा माझ्यावरी मज शोभणारी मुग्धता पाहशी तू मजकडे अन मी तुझी होतेच रे मौन तू घेशी जरी रे जाणते मी रम्यता रोखुनी मी पाहते अन गाळुनी मी ऐकते बोलते मी नेमके अन जाणते तव सौम्यता जोडले नाते मनाने भूतकाळा जाणण्या…
-
अंतरीचा सोनचाफा – ANTAREECHAA SONCHAAFAA
अंतरीचा सोनचाफा तू तया पाहून घे सौरभाला लूट त्याच्या कुंतली माळून घे कुंतलांना सांग कुरळ्या वारियावर लहरण्या मोकळे होऊन त्यासम मस्त तू गाऊन घे नीर शीतल साठलेले लिंब हो काठावरी चंद्रकिरणांच्या सरींनी चिंब तू न्हाऊन घे सोडुनी पाण्यात पाया बैस तेथे क्षणभरी विसरलेल्या पैंजणांना तू पुन्हा बांधून घे बिंब तव पाण्यात सुंदर पाहुनी आश्चर्य का…
-
अनोळखी – ANOLAKHEE
कुणी तरी का तुला म्हणू मी अनोळखी का तुला म्हणू मी फुलाप्रमाणे हृदय तुझे हे जडी बुटी का तुला म्हणू मी सदैव असशी मनात माझ्या जळीस्थळी का तुला म्हणू मी मधुघट अक्षय मला दिले तू कडू गुटी का तुला म्हणू मी सलील निर्झर प्रपात असुनी दरी गिरी का तुला म्हणू मी नवमत वादी विचार तू…
-
तिन्हीसांज – TINHEESAANJ
सकाळी दुपारी लिहावी गझल तिन्हीसांज होता स्मरावी गझल गझल रडव रडवी कधी गाउनी हझल मग लिहावी पुसावी गझल रदीफास टाळे गझल जेधवा म्हणे काफिया मग हरावी गझल पहाटे प्रभाती सकाळी सजल दवाने उन्हाने नहावी गझल लहर वारियाची अधर चुंबिता मिटावी फुलावी झुलावी गझल नयन कारण व्हावी तनू कापरी तिच्या कंपनांनी टिपावी गझल झरझरा खिरे ज्ञान…
-
तुझ्याचसाठी – TUZYAACH SAATHEE
तुझ्याचसाठी अजूनही मी जुन्या स्मृतींच्या उन्हात आहे झरे इथे लेखणी सुवासिक नव्या सुरांनी वहात आहे कधी न कळले तुला जरी हे तुझ्यात गाणे सदैव माझे तुडुंब भरले हृदय जलाने तुझीच प्रतिमा तयात आहे खरेच मी सावरेन आता पुन्हा पुन्हा मी पडेन जेव्हा तुझीच काठी असेल हाती तिच्याचसाठी घरात आहे नको कुठे मज नभात शोधू तुझ्यात…
-
कळसवणी – KALASAVANEE
कुंडलिया मी म्हणू तुला की कुंडलिनी बोल चाँद पुरा मी म्हणू तुला की ‘मखर झणी’ बोल नेत्र तुझे चंचले दुधारी कापत जातात नीरज त्यांना कसे म्हणू मी मंगळिनी बोल मंगळिशी तू सदा मला का चेपविण्या भीड मीच बरा सापडे दिवाना ‘कळसवणी’ बोल अंग तुझे हे फिकेफिकेसे गारठुनी जाय सांगतसे मी कथा फुलांची मुग्ध शनी बोल…
-
ठेका – THEKAA
हाय मी वेडी कितीरे समजले वेडा तुला मस्त तू मैफल गझलची समजले मेळा तुला खात जाशी गोड सारे आवडीने आजही जो दिला पेढा तुला मी वाटला पेठा तुला मी फिदा होतेच तुजवर कालही अन आजही कान भरण्या ते टपोनी समजले केव्हा तुला द्यायचा होता तयांना धवल तुज शेला जरी मी दिलेला जर्द हळदी शोभतो फेटा…