Tag: Ghazal in akshargan vrutta

  • कोण तू – KON TU (WHO ARE YOU)

    In this ghazal, our inner voice tells us to sing a song. When we sing by heart our inner voice takes a form of ghazal. In this ghazal it is explained how our mind sings, dances, and writes poems when we listen to our inner voice. कोण तू कोठून येशी पाय हलके वाजले गा सखे तू…

  • काटा – KATA (THORN)

    सलतो उरात काटा हसतो गुलाब हारे करतात ढोंग अश्रू फसशील लोचनारे रुतती फुलेच आम्हा वदतात कोण जोगी तुडवून पुष्प पायी हसतात भोगणारे लपवून आत वाफा बिजली कडाडतेही झरशील मूक मेघा बुडतील काठ कारे उडतो नभात आहे आता पतंग माझा येणार मीच खाली थकतील हात सारे मम भाव पुष्प होडी फिरते जली मनाच्या पकडून ठेवी ओठ…

  • ब्रम्हचर्य व्रत – BRAMHACHARYA VRATA (WALKING IN THE DIVINE)

    Here Radif is directly absent but indirectly present. Kafiyas are Bhaaree, Vaaree, Naaree. ब्रम्हचर्य व्रत भारी स्वर्गाची जणु वारी आत्मधर्म जाणतात पुण्यवान नर नारी

  • घायाळ – GHAYAL (SMITTEN)

    This is the poem containing four lines written in the form of Muktak. In this poem Radif and Kafiya are present. स्मरणी ठेवा घरंदाज मी मारिन टोला फलंदाज मी मुक्यानेच घायाळ करावे अशी आगळी तिरंदाज मी

  • राजसी – RAJASI (MAJESTIC)

    हंस तू राजसी पण मला टाळिशी बोलणे ते तुझे गुंजते मानसी त्या जुन्या स्मृतित मी बहरते मस्तशी कामसू जग जरी मीच का आळशी डाव ना संपला हार का मानशी घे मला प्राशुनी घाव का मोजिशी वृत्त- गा ल गा, गा ल गा.

  • चिंब मी – CHIMB MEE (I AM DRIPPING WET)

    भिजून चिंब चिंब मी तरी नसे तुडुंब मी विशाल शून्य तू जरी निवांत एक टिंब मी झळाळशील बघ अता तुझेच शांत बिंब मी करेन शुद्ध ही हवा कडू वनात निंब मी जपेन गारवा इथे नव्हेच आग, बंब मी नकोच आडवे पडू कधी कधीच लंब मी वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.

  • तू सांडतेस काही – TU SANDATES KAHI (ARE YOU SPILLING SOMETHING)

    तू सांडतेस काही मग चाळतेस काही बोलायचे तसे ना पण बोलतेस काही श्वासातुनी मुक्याने मज सांगतेस काही जवळी असून सारे बघ शोधतेस काही जमवून चांदण्यांना ना माळतेस काही हा क्रम आणि मात्रा का गाळतेस काही ओझे न ही ‘सुनेत्रा’ तरि वाहतेस काही वृत्त- गा गा ल गा, ल गा गा.