-
काय झाले – KAAY ZAALE
मी काय होते काय झाले भलतीच हाय नि फाय झाले सांभाळण्या ही गझल माझी मी भांडणारी माय झाले होते जरी मी देवमाता का मारकूटी गाय झाले मी मस्तकी होते जरी तव तुज चालवाया पाय झाले मी दुग्धगंगा वाहणारी तापून हलके साय झाले वृत्त – अक्षरगण वृत्त, मात्रा १६ लगावली – गा गा ल गा/ गा…
-
समीक्षक – SAMEEKSHAK
काहीच ना मी बोलले त्यांचेच त्यांना झोंबले उपदेश सारा ऐकला अन घ्यायचे ते घेतले गोष्टी जरी होत्या जुन्या मी त्यात मजला शोधले गझलेत मी बुडले जरी मी ना कधीही गंडले ज्यांना मिळाले फुकटचे त्यांनीच पैसे वाटले बोलाल जर उडवू तुम्हा फर्मान त्यांनी सोडले त्यांनी न लिहिली ओळही पण अर्थ मोठे काढले निंदाच करुनी छापल्या परखड…
-
पुरुषार्थ – PURUSHAARTH
का पसरले झोळीस तू गोंजारले टोळीस तू का तेल पुन्हा ओतले भडकावण्या होळीस तू ते हात सुंदर साजिरे का बांधले मोळीस तू का ठेवला पत्रा जुना भाजावया पोळीस तू पुरुषार्थ मोठा दावला खिजवून त्या भोळीस तू जर लाज तुज ना वाटली का खोडले ओळीस तू वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…
-
मैत्रीण – MAITREEN
निवृत्त मी होऊ कशी अदृश्य मी होऊ कशी येतेच लक्ष्मी द्यावया कंगाल मी होऊ कशी मैत्रीण माझी शारदा मतिमंद मी होऊ कशी सौंदर्य साधे लाभले जड कुरुप मी होऊ कशी मज लेकुरे बोलावती मुकबधिर मी होऊ कशी जोहार करिता बालिका अंगार मी होऊ कशी माथ्यावरी ना सावली हिमगौर मी होऊ कशी वृत्त – संयुत, मात्रा…
-
माझा मित्र – MAAZAA MITRA
पाऊस माझा मित्र हा वर्षाव माझा मित्र हा अस्तास जाता सूर्य तो काळोख माझा मित्र हा दगडास पाझर फोडतो भूकंप माझा मित्र हा चष्मा सदा बदले जरी ऋतुरंग माझा मित्र हा मतदान करण्या येतसे माणूस माझा मित्र हा प्राण्यावरी प्रीती करे प्राणीच माझा मित्र हा हे वृत्त संयुत शालिनी शालीन माझा मित्र हा वृत्त –…
-
आंधळे – AANDHALE
ते रान का कोमेजले वाऱ्यास कोणी रोखले त्यांचा छुपा हल्ला तरी नाहीच मी भांबावले माझे न काही बिघडले त्यांचेच त्यांना भोवले हा प्रश्न पण छळतो मला विपरीत कोणी वाचले ते ठार होते आंधळे तेव्हांच मी ते जाणले गुन्हे करानी चोरटे नरकात कुठल्या चालले ये पावसा बिनधास्त ये आताच घर शाकारले वृत्त – संयुत, मात्रा १४…
-
बाजार – BAAJAAR
थंडावता बाजार हा मंदावला व्यापार हा प्राशून पाणी क्षारमय झाला कमी आजार हा टाळूनिया पुनरुक्तिला आला तिला आकार हा देताच दगडा रूप मी झाला सगुण साकार हा वाटून सारी बंडले विझला अता अंगार हा झाला किती कृतकृत्य तो उच्चारता आभार हा गेला तसा आला पुन्हा परतूनिया साभार हा वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली –…